‘तू आता संपलास, तुला निलंबितच करतो’, जिल्हाधिकाऱ्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर प्रशासकीय अधिकारी एका पोलीस अधिकाऱ्यावर रुबाब दाखवत धमकावतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील वरदराजा पेरुमल मंदिरातील आहे. मंदिरात आलेल्या भक्तांना व्हीआयपी गेटमधून आत सोडत असल्याने हा जिल्हाधिकारी थेट पोलीस अधिकाऱ्यालाच धमकी देताना दिसत आहे.

हा व्हीडिओ २ मिनिटांचा असून, जिल्हाअधिकारी पोलीस अधिकाऱ्याला धमकावत आहेत. मंदिरात आलेल्या भक्तांना व्हीआयपी गेटमधून सोडत असल्याने हा अधिकारी पोलीसांवर भडकलेला दिसत आहे. तुम्ही येथे फसवणूक करण्यासाठी येता? मी तुम्हाला संपवून टाकेन. तुम्ही काय तपासणी करत आहात? अनेकजण विना पास जात आहेत. जेव्हा व्हीयआपी येतात, तेव्हा मुर्खासारखे उभे राहतात, असं हा जिल्हाधिकारी बोलताना दिसत आहे. तसंच वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि महत्त्वाचे नेते येत आहेत. तू आता संपलास. आजच निलंबन करतोय मी, अशी धमकी हा जिल्हाधिकारी देताना दिसत आहे.

या जिल्हाधिकाऱ्याचे नाव पी पोन्निया असून व्हीडिओमध्ये असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव रमेश आहे. पोन्निया हे धमकी देऊन शांत नव्हते झाले. त्यांनी त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला आणि इतर पोलीसांवरही टीका करण्यास सुरुवात केली. तुम्ही पोलीस कर्मचारी उद्धट असता. तुमचे महानिरीक्षक कुठे आहेत ? त्यांना यायला सांगा, असं पोन्निया हे म्हणताना दिसत आहेत. मात्र हा पोलीस अधिकारी त्यांना विनंती करताना दिसत आहे.

पोलीस अधिकारी रमेश यांनी फक्त एका वयस्कर दांपत्याला त्रास होऊ नये यासाठी व्हीआयपी गेटने जाण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे हा जिल्हाधिकारी चिडला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आपली पातळी ओलांडल्याची टीका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केली आहे. मात्र यावर स्पष्टीकरण देत व्यवस्थित काम सुरु नसल्याने आपला संताप झाला, त्यामुळे ही चिडचिड झाली असं पोन्नीया यांनी सांगितल.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like