NIA चे तामिळनाडूत 5 ठिकाणी छापे, मोठ्या प्रमाणात संशयित साहित्य जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने तामिळनाडूमधील कोईम्बतूर शहरात छापेमारी सुरु केली आहे. तामिळनाडूमधील पाच शहरांत एनआयएने छापे मारले असून यादरम्यान मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत.

एनआयएने तामिळनाडूमधील कोइम्बतूरमधील उक्कदम, बिलाल नगर, करुम्बुकदाई यासह पाच ठिकाणी छापेमारी केली. अनेक दिवस एनआयएच्या निशाण्यावर असलेल्या उमर फारूक, सनाबर अली, समीना मुबीन, मोहम्मद यासिर, सदम हुसैन यांच्या घरावर छापा मारून तपास केला. मात्र कोणत्या प्रकरणात त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली याची माहिती मिळालेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार काही दहशहतवादी भारतात घुसण्याच्या प्रयत्नांत असल्याने त्यांनी या लोकांशी संपर्क साधलेला नाही ना यासाठी हि छापेमारी करण्यात आली आहे. छापेमारी करण्यात आलेल्या अजरुद्दीन आणि शेख हिदायतुल्ला हे आधीपासूनच अटकेत आहेत.

दरम्यान, याआधी देखील एनआयएने जून महिन्यात कोईम्बतूर मधील सात ठिकाणी छापे मारले होते. यामध्ये श्रीलंकेत ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या हल्ल्यातील मास्टर माईंड अजहरुद्दीनच्या सोशल मीडियावरील मित्राच्या घराचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी श्रीलंकामार्गे दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात मोठ्या प्रमाणात कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –