Tata Airbus | टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधार्‍यांचीच विरोधकांना धमकी, ‘या’ नेत्यांची नार्को टेस्ट करा, सर्व गुपिते समोर येतील

मुंबई : Tata Airbus | राज्यात येणारे मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात असल्याने लोकांमध्ये विशेषता तरूण वर्गात सध्या संतापाची भावना आहे. वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn), ड्रग प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा टाटा समूहाचा एअरबस (Tata Airbus) प्रकल्पही गुजरातला गेला आहे. टाटा एअर बस प्रकल्पाची तर उदय सामंत (Udaya Samant) यांनी सप्टेंबरमध्ये घोषणाही केली होती. यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांना घेरले आहे. तर सत्ताधारी विरोधकांवरच आरोप करत असल्याने वातावरण आणखी बिघडत चालले आहे. आता भाजपाचे (BJP) मुंबईतील नेते राम कदम (Ram Kadam) यांनी विरोधक खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.

राम कदम यांनी म्हटले की, एअरबस (Tata Airbus) आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटे बोलणार्‍या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्को टेस्ट (Narco Test) करावी. नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील. वेदांता फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले? असा सवाल कदम यांनी ट्विटद्वारे केला आहे.

राम कदम यांनी म्हटले आहे की, सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्या पासून कॉन्ट्रॅक्टर पर्यंत, आणी बदल्यामध्ये किती करोड रुपये द्यायचे याची लिस्टच बनवली होती. ज्यांनी वाझे पासून अधिकार्‍यांना वसुली-वसुली खेळात जुंपले होते. त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली? मीटिंगला कोण कोण उपस्थित होते?

वेदांताने जागा फायनल करून सुद्धा त्यांच्यासोबत एमआयू का केला नाही? कंपनीच्या प्रमुख लोकांना भेटण्यास टाळाटाळ का? आणि कोणाच्या सांगण्यावरून केली? नेमके हेच कारण एअरबसच्या बाबतीत सुद्धा आहे का? नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील, असे कदम यांनी म्हटले असून चोराच्या उलट्या बोंबा हा हॅशटॅग वापरला आहे.

Web Title :-  Tata Airbus | bjp ram kadam slams mahavikas aghadi leader airbus project and vedanta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Big Boss | सलमान खान कतरिना कैफच्या तालावर नाचला, काय आहे नेमके प्रकरण?

Gulabrao Patil | कोणीही बिकाऊ नाही, राणांनी आपले शब्द मागे घेतले पाहिजेत – गुलाबराव पाटील

Bachchu Kadu | बच्चू कडूंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘खोकेवाले आमदार म्हणतात हे दु:ख, काही आमदारांनी मला फोन करून…’