Tata Airbus Project | राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठीच मिंदे सरकार आले; सुभाष देसाईंची जोरदार टीका

मुंबई : नागपुरात येणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही (Tata Airbus Project) गुजरातला गेला आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) गुजरातला गेल्याने संताप व्यक्त होत होता, त्यापाठोपाठ आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला पळविल्याने महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधकांनी सुद्धा राज्य सरकारला (State Government) घेरले आहे. आता 22 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प (Tata Airbus Project) गुजरात राज्यातील बडोदा येथे होणार आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करणार आहेत. यावरून माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर येथील तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि एकाच राज्यात गेले आहेत. यावर शिंदे-फडणवीस सरकार ब्र देखील का काढत नाही, भाजपच्या (BJP) नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडून (Central Government) राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले आहे.

सुभाष देसाई म्हणाले, टाटा-एअर बस (Tata Airbus Project) या 22 हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना तो प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गेल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात आहे.

राज्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती देताना सुभाष देसाई म्हणाले, बेंगळुरूमध्ये हवाई उद्योगांशी संबंधित एक
मोठे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्या ठिकाणी टाटा आणि एअरबसच्या अधिकार्‍यांसोबत प्रकल्पाबाबत चर्चा झाली.
मनुष्यबळ, सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती.
त्यानंतर पुढे ’वर्षा’ बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray),
टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर (Chandrasekhar) यांच्यासोबत एक बैठक झाली.
यामध्ये सेमीकंडक्टर, एअरबस आणि इतर प्रकल्पांबाबतही चर्चा झाली होती.
त्याच्या पुढील टप्प्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत मी स्वत: मंत्री आदित्य ठाकरे
(Aditya Thackeray), टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासह संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा होती. मग नंतर हे प्रकल्प बाहेर का गेले हा प्रश्न आहे.

Web Title :- Tata Airbus Project | shivsena subhash desai criticized shinde and fadnavis govt over tata airbus project went to gujarat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil | टाटा एअरबस प्रकल्पावरुन जयंत पाटील संतापले, राज्य सरकारला केला सवाल, ‘अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?’

Bigg Boss 16 | ‘बिग बॉस’च्या घरात होणार कतरिना कैफची एंट्री, आणखी एक विशेष म्हणजे…