TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या TATA टाटा डिजिटल लिमिटेडने अलीबाबा समर्थीत देशातील सर्वात मोठी ऑनलाइन ग्रोसरी कंपनी बिग बास्केटमध्ये मोठी भागीदारी मिळवली आहे. टाटा डिजिटल TATA ही टाटा सन्सची 100 टक्के मालकीची कंपनी आहे. या डीलसह टाटा ग्रुपची आता रिटेल सेक्टरमध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांसोबत थेट टक्कर होणार आहे.

टाटा डिजिटलचे सीईओ प्रतीक पाल यांनी शुक्रवारी म्हटले, भारतात व्यक्तीगत उपभोग खर्चात सर्वात मोठा खर्च किराणा सामानाचा आहे. बिग बास्केट भारताची सर्वात मोठी ई-किराणा कंपनी असल्याने एक व्यापक ग्राहक डिजिटल प्रणाली बनवण्याच्या आमच्या रणनीतीमध्ये पूर्णपणे योग्य ठरते.

या डीलची किंमत सांगण्यात आलेली नाही. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने यापूर्वी मार्चमध्ये टाटा डिजिटलद्वारे TATA बिग बास्केटमध्ये 54.3 टक्के भागीदारीचे संपादन करण्यास मंजूरी दिली होती. यापूर्वी बातमी आली होती की, टाटा ऑनलाइन विक्रेता कंपनीत 80 टक्के भागीदारी खरेदीवर चर्चा करत आहेत.

1,000 अरब डॉलरच्या एकुण किरकोळ बाजारात अर्धा भाग किराणाचा आहे. वर्ष 2021 मध्ये ऑनलाईन किराणा बाजाराचा आकार 4.3 अरब डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. यापूर्वीच्या सहा वर्षात तो 2.9 अरब डॉलरवर होता.

बिग बास्केटची स्थापना 2011 मध्ये बेंगळुरुमध्ये झाली होती. तेव्हापासून देशाच्या 25 शहरांत आपली उपस्थिती नोंदवली आहे. बिग बास्केटचे सीईओ हरी मेनन यांनी म्हटले, टाटा ग्रुपचा भाग बनल्यानंतर आम्ही आमच्या भविष्याबाबत खुप उत्सुक आहोत. टाटा ग्रुपसह आम्ही ग्राहकांसोबत आणखी चांगल्या प्रकारे जोडले जाऊ आणि पुढील प्रवास करू शकतो.

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय