Tata Group Share | 5 दिवसांपासून टाटाची कंपनी देत आहे गुंतवणुकदारांना झटका, आता डाव लावण्याचा मिळेल फायदा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group Share | गेल्या काही दिवसांपासून देशातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) गुंतवणुकदारांचे नुकसान करत आहे. टीसीएसचा शेयर अवघ्या पाच दिवसांत 6 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मंगळवारच्या व्यवहारातही शेअरचा भाव घसरणीसह बंद झाला (Tata Group Share). TCS मध्ये ही घसरण अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीने बायबॅकची घोषणा केली आहे. (Share Market Marathi News)

 

काय म्हणतात एक्सपर्ट :
GCL सिक्युरिटीजचे व्हाईस चेअरमन रवी सिंघल म्हणाले, रशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युक्रेनच्या संकटामुळे डॉलर इंडेक्स घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रशिया – युक्रेनच्या संघर्षाचा फायदा निर्यात – केंद्रित आयटी कंपन्यांना होणार आहे. यामुळे TCS सारख्या मोठ्या निर्यातकेंद्रित आयटी कंपनीला फायदा होईल.

 

सध्या टीसीएसच्या शेअर बायबॅकच्या घोषणेमुळे शेअर्सची मागणी आणखी वाढेल. त्यामुळे येत्या एका महिन्यात हा आयटी स्टॉक 4200 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. (Tata Group Share)

 

तज्ञांच्या मते, लार्ज – कॅप स्टॉक म्हणून, आयटी क्षेत्रातील हा एक सुरक्षित डाव आहे.
SEBI रजिस्टर राईट रिसर्चच्या संस्थापक सोनम श्रीवास्तव म्हणाल्या, कंपनी 20% जास्त दराने शेअर्स पुन्हा खरेदी करत आहे.

आता किती आहे किंमत :
आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या दिवशी शेअरची किंमत जवळपास 4 टक्क्यांनी घसरली. व्यवहाराच्या शेवटी,
शेअरची किंमत 127.85 रुपयांनी घसरून 3592.40 रुपये झाली आहे. बाजार भांडवल 13 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Tata Group Share | rata tata led tcs shares down 6 percent in 5 days should you buy the it stock detai here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा