Nawab Malik | नवाब मलिक राजीनामा देणार?; शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय?

पोलीसनामा ऑनलाइम टीम – Nawab Malik | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. दुसरीकडे आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची बड्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मलिकांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

 

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवारांनी (Sharad Pawar) फेटाळली आहे. सिल्वर ओक पार पडलेल्या बैठकीमध्ये नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा (Resigned) घेणार नसल्याचं समजत आहे. या पार पाडलेल्या बैठकीमध्ये (Meeting), भाजपने ज्या पद्धतीन सरकारी यंत्रणांचा वापर केला त्याचा जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आदेश शरद पवारांनी दिले असल्याची माहिती समजत आहे.

 

या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती आहे. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे वर्षा बंगल्यावर जाणार असून तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोर्टात (Court) सुनावणी चालू असून या प्रकरणावर कोर्ट काय निर्णय घेतं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भाजपला (BJP) पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल,
अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
मात्र आता थेट मलिकांनीच पवारांनीच राजीनामा फेटाळल्यामुळे भाजप काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल.

 

दरम्यान, सिल्वर ओक बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,
आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,
महसुल मंत्री बाळासाहेब पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आपला दौरा रद्द करून बैठकीसाठी आले होते.

 

 

Web Title :- Nawab Malik | Nawab Malik to resign?; Sharad Pawar’s big decision on Malik’s resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 165 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

 

Child’s Nutrition Tips | 2 वर्षानंतर पुन्हा शाळेत जात आहेत मुले, ‘या’ 5 टिप्सच्या मदतीने करा त्यांची नवीन लाईफस्टाइल मॅनेज