Tata Group | जेफ बेजोस यांची अमेझॉन आणि अंबानींच्या जिओमार्टला टक्कर देणार टाटाचे हे सुपरअ‍ॅप, नवीन वर्षात होणार लाँच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tata Group | टाटा समूह (Tata Group) ऑनलाइन रिटेल स्पेसमध्ये सुरू असलेली वर्चस्वाची लढाई आणखी रंजक करण्याच्या तयारीत आहे. यासाठी समूहाची कंपनी टाटा डिजिटल (Tata Digital) सुपरअ‍ॅपवर जोरात काम करत आहे. हे अ‍ॅप (Tata SuperApp) एकाच ठिकाणी शॉपिंग करण्यापासून हॉटेल बुकिंग करण्यापर्यंत सुविधा देईल. टाटाचे सुपरअ‍ॅप जेफ बेजोस यांच्या अमेझॉन (Amazon) आणि मुकेश अंबानींच्या जिओमार्टला (JioMart) कडवे आव्हान देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

7 लाख कर्मचार्‍यांचा बीटा टेस्टिंगमध्ये सहभाग
इंग्रजी वर्तमानपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, टाटा डिजिटलचे हे सुपरअ‍ॅप तयार झाले आहे. टाटाच्या या अ‍ॅपवर मोठ्या कालावधीपासून विश्लेषकांची नजर होती. रिपोर्टनुसार, सध्या हे अ‍ॅप बीटा टेस्टिंग फेजमध्ये आहे. समूहातील 7 लाखापेक्षा जास्त कर्मचारी या टेस्टिंगमध्ये भाग घेत आहेत.

पुढील वर्षी सर्वांसाठी खुले होईल अ‍ॅप
हे सुपरअ‍ॅप पुढील वर्षाच्या सुरूवातीला सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची योजना आहे. टाटा समूहाने ऑनलाइन मार्केटप्लेसमधून संबंधित काही कायद्यांबाबत अस्पष्टता असल्याने अ‍ॅपचे लाँचिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता समूहाने प्रतिक्षा करण्याऐवजी लाँच करण्याचा विचार केला आहे.

ई-कॉमर्स पेमेंट लॉयल्टी पॉईंटमध्ये बदलते
रिपोर्टमध्ये कंपनीचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, या सुपरअ‍ॅपवर करण्यात आलेले ई-कॉमर्स पेमेंट लॉयल्टी पॉईंटमध्ये बदलते. प्रत्येक पॉईंट एक रुपयांच्या बरोबरीने असतो. हे पॉईंट टाटाच्या कोणत्याही ब्रँडच्या खरेदीसाठी रिडीम करता येऊ शकतात.

 

सुपरअ‍ॅपसोबत Tata Group च्या अनेक कंपन्या

सुपरअ‍ॅपवर समूहाच्या अनेक कंपन्या जोडल्या गेल्या आहेत.
सध्या या अ‍ॅपवर टाटा समूहाचे इंडियन हॉटेल्स, क्रोमा, बिगबास्केट, 1एमजी आणि एक विमा कंपनी जोडण्यात आली आहे.
अगोदरपासून काम करत असलेली समूहाची ई-कॉमर्स कंपनी टाटा क्लिकला सुद्धा अ‍ॅपसोबत जोडण्याचे काम बाकी आहे.

ऑनलाइन रिटेल सेक्टरमधील स्पर्धा वाढणार
देशात 4G ने ऑनलाइन रिटेल सेक्टरची शक्यता वाढवली आहे. 5G च्या येण्याने या सेक्टरचा आकार आणखी काही पट वाढेल.
याच कारणामुळे भारतीय ऑनलाइन रिटेल सेक्टरमध्ये दिग्गज आमने-सामने येत आहेत.

स्पर्धा आणखी लक्षवेधक होणार
जेफ बेजोस यांच्या अमेझॉनसोबत सध्या वॉलमार्टची फ्लिपकार्ट आणि मुकेश अंबानींच्या जिओ मार्टची स्पर्धा आहे.
टाटाच्या सुपरअ‍ॅपने ऑनलाइन रिटेल सेक्टरमधील स्पर्धा आणखी लक्षवेधक होणार आहे.

Web Titel :- Tata Group | tata group to launch superapp in new year will compete with amazon of jeff bezos and jio mart of mukesh ambani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indian Army | काश्मीरमधून भारतीय लष्कर हटवले तर तिथे सुद्धा तालिबान येईल, ब्रिटिश खासदाराने जगाला दिला इशारा (व्हिडीओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | सराईत शिकलगरी टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त (CCTV Video)