सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच टाटा स्कायने जाहीर केली चॅनेल पॅक्स लिस्ट 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – केबल आणि डीटीएचसाठीचे असणारे नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्याआधीच भारतातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी असलेल्या टाटा स्कायने आपल्या नवीन चॅनेल पॅक्सची लिस्ट जाहीर केली आहे. टाटा स्कायच्या सीईओंनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ट्रायच्या नवीन नियमांचे पालन करुनच हे नवे पॅक्स जाहीर केले आहे.
असे असतील टाटा स्कायचे नवीन चॅनल पॅक्स… 
टाटा स्कायने लाँच केलेल्या या नवीन पॅक्सची किंमत १८१ रुपयांपासून ७७६ रुपयांपर्यंत असणार आहे. त्यात कंपनीने विभागणी केली असून हिंदी पॅक्स 212 पासून 473 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आपल्या आवडीचे चॅनेल निवडता येवू शकेल. याचबरोबर ग्राहकांना पॅक्सच्या किमतीं व्यतिरिक्त नेटवर्क कॅपेसिटी फी वेगळी भरावी लागणार आहे.
प्रत्येक टिव्हीला घावे लागणार आहे वेगळे कनेक्शन… 
येत्या 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना एकाच घरातील दोन टिव्हींसाठी वेगवेगळे कनेक्शन घ्यावे लागणार आहे. सध्या ग्राहक जो प्लॅन वापरात आहे तो संपेपर्यंत त्यांना नवबीन नियम लागू न करण्याचा निर्णय ट्रायने घेउवून लोकांना दिलासा दिला आहे. जुना प्लॅन संपल्यानंतरच त्यांना ट्रायचे नवीन नियम लागू होणार आहे.