Tata Sky | 18 वर्षानंतर बदलणार आहे DTH कंपनी टाटा स्कायचे नाव, आता Tata Play च्या नावाने ओळखली जाईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील आघाडीची डायरेक्ट-टू-होम (DTH) कंपनी टाटा स्काय 18 वर्षानंतर आपले नाव बदलणार आहे. 27 जानेवारी रोजी टाटा स्कायचे (Tata Sky) नवीन नाव टाटा प्ले (Tata Play)असेल. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचा व्यवसाय आता थेट घरापुरता मर्यादित राहिलेला नसून त्यापलीकडे त्याचा विस्तार झाला आहे. त्यामुळे नव्या स्थितीनुसार टाटा स्कायने (Tata Sky) नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

19 मिलियनहून जास्त सक्रिय ग्राहक असलेल्या टाटा स्कायचे म्हणणे आहे की त्यांचा व्यवसाय DTH सेवेच्या पलीकडे वाढला आहे आणि आता त्यात फायबर-टू-होम ब्रॉडबँड आणि Binge चा समावेश आहे, जी 14 OTT (ओव्हर-द-टॉप) सेवा देखील प्रदान करते.

 

टाटा प्लेचे एमडी आणि सीईओ हरित नागपाल (Harit Nagpal) यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, आम्ही सुरुवातीला डीटीएच कंपनी म्हणून सुरुवात केली होती, परंतु आता आम्ही कंटेंट डिस्ट्रीब्युशन कंपनी बनलो आहोत. ते म्हणाले की कंपनीने आता ओटीटी आणि ब्रॉडबँड व्यवसायातही प्रवेश केला आहे.

नागपाल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत टाटा स्कायने डीटीएच क्षेत्रात आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.
याशिवाय, ब्रॉडबँड व्यवसाय देखील वेगाने वाढत आहे आणि आम्ही त्याला टाटा प्ले फायबर (Tata Play Fiber) असे नाव दिले आहे.
त्याचप्रमाणे, Tata Play Binge वर 14 प्रमुख ओव्हर-द-टॉप अ‍ॅप्स आहेत.

 

सीईओ म्हणाले की डीटीएच हा त्यांचा सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वात मोठा व्यवसाय राहील,
तर ओटीटी देखील मोठा होणार आहे आणि अशा प्रकारे डीटीएच व्यवसायाच्या पलीकडे जाऊन ब्रँडची ओळख होण्याची वेळ आली आहे.
टाटा स्काय 2004 मध्ये सुरू केले होते. (Tata Sky)

 

अहवालानुसार, कंपनीचे म्हणणे आहे की येत्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केले जाईल.
राष्ट्रीय बाजारपेठांमध्ये त्याच्या प्रमोशनसाठी, टाटा स्कायने करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांना घेतले आहे.
त्याच वेळी, आर माधवन आणि प्रियामणी दक्षिण भारतीय राज्यांमध्ये कंपनीची जाहिरात करतील.

 

Web Title :- Tata Sky | tata sky rebrands as tata play dth company drops brand name after 18 year run

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra School Reopen | 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

 

Pune Crime | पुण्याच्या एरंडवणे येथील ‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार, सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर FIR

 

Bigg Boss 15 | बिग बॉस 15 मध्ये रश्मि देसाईसोबत राखी सावंतनं केलं जोरदार भांडण, रश्मि म्हणाली – शमिता होणार बिग बॉस 15ची विजेती…