कलम 370 – CAA च्या समर्थनार्थ शरीरावर बनवला सर्व राज्यांचा टॅट्यूचा ‘नकाशा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० आणि CAA च्या स्मरणार्थ राजस्थानमधील एका व्यक्तीने आपल्या शरीरावर भारतातील सर्व राज्यांचे नकाशे आणि देशातील मुख्य पर्यटन स्थळे टॅटूद्वारे गोंधून घेतले आहे. आर्यन सोनी (३३) असे या तरुणाचे नाव असून त्याने शरीरावर २८ राज्य , ९ केंद्रशासित प्रदेश आणि त्या राज्यांतील प्रमुख पर्यटनस्थळांचे टॅटूही काढले आहेत.

राजस्थानातील बीकानेर जिल्ह्यातील जस्सूसर गेट भागात राहणाऱ्या आर्यन सोनीला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, ‘शरीरावर बनविलेले हे टॅटू म्हणजे माझे देशाबद्दलचे प्रेम, आर्यन म्हणाले की, कलम ३७० आणि सीएए समर्थनार्थ आपल्या संपूर्ण शरीरावर अखंड भारताचा नकाशा तयार केला आहे. आर्यन सोनी यांच्या शरीरावर टॅटूमध्ये ताजमहाल, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सुवर्ण मंदिर, कुरुक्षेत्र, लडाखचा पर्वत, गेट वे ऑफ इंडिया, जैसलमेरचा ढोरे, ऐतिहासिक वास्तू आणि लालकिलासह अनेक प्रांतांचे पर्यटन स्थळे आहेत. दरम्यान, आता ते आपले सर्व टॅटू घेऊन जेनियस, लिम्का आणि इंडिया बुकमध्ये विक्रम नोंदवणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन ६ महिन्यांपासून त्याच्या शरीरावर टॅटू गोंधत आहे. २५ सप्टेंबर २०१९ रोजी सुरू झालेले हे टॅटू करण्याचे काम २६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण होईल. तो टॅटू बनवण्यासाठी दररोज ६ ते ७ तास टॅटू पार्लरमध्ये बसत असे. टॅटू निर्माता विष्णू स्वामी म्हणाले की, तो दररोज एक किंवा दोन टॅटू बनवू शकतो. पहिल्या दोन महिन्यांत, त्यांनी भारतातील प्रत्येक राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांसाठी एक ब्लू प्रिंट तयार केला. यानंतर, पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाले.

तसेच विष्णू स्वामी यांनी सांगितले की ते आर्यनकडून मिळालेले पैसे अनाथाश्रमात देतील. कारण याआधी जेव्हा आर्यने टॅटूच्या बदल्यात पैसे दिले आहेत, तेव्हा विष्णूने ते पुलवामा हल्ला धर्मादाय संस्था, राष्ट्रीय व्याज आणि अनाथाश्रम देत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –