अजित पवारांचा मोदींना टोला; म्हणाले – ‘गुजरातला एक हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणनं आयोजित केलेल्या मुंबई मेट्रो -२ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीचं उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याची कोणती कामं असतील काही मागण्या असतील तर सांगा मी त्या केंद्रापर्यंत पोहोचवून कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करतो. असे ते म्हणाले. यावरून अजित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

Pune : पुणे शहरात 8 दिवसांत तरुणवर्गातील 74 हजार 691 जणांचे लसीकरण

Pune : थायलंडच्या कंपनीत गुंतवणुक करण्याच्या आमिषाने फसवणूक

 

अजित पवार बोलताना म्हणाले की, रामदास आठवले यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की केंद्राकडून काही मदत हवी असल्यास कळवा. माझा रामदास आठवलेंना एवढीच विनंती आहे की तुम्ही केंद्रात आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा मोदींनी केवळ गुजरातचा दौरा केला आणि तातडीनं १ हजार कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात ते का आले नाहीत? हे अजून काही कळालेलं नाही. महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे पवार यांनीं म्हटलं आहे.

शिवसेना आमदाराला ‘ते’ प्रकरण पडले महागात; न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा अन् दंड

कतरिना कैफला विकी कौशलनं घातली लग्नाची मागणी, ‘भाईजान’ सलमाननं दिली ही रिअ‍ॅक्शन (व्हिडीओ)

पुढे अजित पवार म्हणाले, मुंबईत विविध पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत आणि पुढील काळात आणखी कामं होतीलही. परंतु पेट्रोलच्या दराने आता काही शहरात शंभरी गाठली आहे. म्हणून आठवले साहेब केंद्राला पेट्रोलच्या किंमतीतही लक्ष घालायला सांगा, असा सल्ला देत अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्याकडे विनंती केली आहे.

तुम्हाला माहित का ? अमिताभ यांचे २५ टक्केच लिव्हर काम करते, ‘या’ चुकांमुळे होते कमजोर

 

Pune : सिंहगड परिसरात एका सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू

Scars Removal : चेहर्‍यावरील जखमेच्या खुणांमुळं चिंतीत आहात ?, ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’