Tax Planning | इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 7 पद्धती, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ उपाय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Tax Planning | चालू आर्थिक वर्ष 2021-22 संपायला दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. कंपन्यांनी आता अॅडव्हान्स टॅक्सही (Advance Tax) कापण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त कर वाचवायचा असेल, तर काही कामे लवकरात लवकर करून घ्या. सीए अजय बगाडिया तुम्हाला असे अनेक मार्ग सांगत आहेत ज्याद्वारे तुम्ही आयकर कलम 80सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांचा कर वाचवू शकता. तसेच, 80सी व्यतिरिक्त, इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही कर वाचवू शकता. (Tax Planning)
मुलगी वाचवेल तुमचा प्राप्तीकर
जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही तिच्या नावावर सुकन्या समृद्धी योजनेत Sukanya Samriddhi Yojana (SSY) गुंतवणूक (Invest in SSY) करू शकता. यावरील व्याजदर 7.6 टक्के आहे. यावर कर कपातीचाही फायदा आहे. दुसरीकडे, बगाडिया म्हणतात की घरभाडे भत्त्यावरील (House Rent) कर सवलत मेट्रो सिटी (50 टक्के) किंवा नॉन-मेट्रो सिटी (40 टक्के) या आधारावर मोजली जाते. कोणत्याही स्थितीत HRA पेक्षा जास्त सूट मिळणार नाही. (Save Income Tax)
पीपीएफमध्ये करा गुंतवणूक
तुम्ही अद्याप हा पर्याय निवडला नसेल, तर त्यामध्ये लवकर गुंतवणूक करणे चांगले. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच Public Provident Fund (PPF) ही कर वाचवण्यासाठी सरकारी गुंतवणूक (PPF Account) योजना मानली जाते, ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्यावर सध्या वार्षिक 7.10 टक्के व्याज मिळते. (Tax Planning)
NPS उपयोगी
बगाडिया स्पष्ट करतात की नॅशनल पेन्शन स्किम National Pension Scheme (NPS) म्हणजेच एनपीएस ही सरकारद्वारे चालवली जाणारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. कलम 80सी अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात आणि कलम 80CCD (1B) अंतर्गत अतिरिक्त 50 हजार रुपये गुंतवले जाऊ शकतात. याशिवाय ट्युशन फी, घराच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे देखील करमुक्तीसाठी प्रभावी उपाय आहेत.
सिनियर सिटिझन सेव्हिंग स्किम (Senior Citizen Saving Scheme)
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या या बचत योजनेत बँका आणि पोस्ट ऑफिसमधून गुंतवणूक करता येते. त्यावर वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळते. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीला कलम 80सी अंतर्गत कर सूट मिळते.
विमा नसेल तर लवकर काढा
विमा हा देखील कर वाचवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स Unit Linked Insurance Plans (ULIP) आणि पारंपारिक विमा योजना प्रीमियमवर कर सूट मिळण्यास पात्र आहेत, परंतु लक्षात ठेवा की ULIP प्रीमियमची रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास कर सूट मिळत नाही. (Tax Benefit)
टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटमधून कर सवलत
टॅक्स सेव्हिंग एफडीद्वारे कर सवलत मिळू शकते. परंतु हा फारसा चांगला पर्याय नाही कारण तो 5 टक्क्यांपेक्षा कमी वार्षिक रिटर्न देईल आणि 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी देखील आहे. (Tax Saving Fixed Deposit)
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम : 80सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत सूट
ही इक्विटी म्युच्युअल फंडची योजना आहे. यामध्ये 80सी अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचे रिटर्न करमुक्त आहे आणि लॉक-इन कालावधी देखील 3 वर्षांचा सर्वात कमी आहे. (Equity Linked Saving Scheme)
80सी व्यतिरिक्त हे कर लाभ
घरभाडे भत्ता, रजा प्रवास भत्ता, गृहकर्जाचे व्याज आणि मुलांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजावर कर सवलत उपलब्ध आहे.
कलम 80जी अंतर्गत देणग्या आणि कलम 80डी अंतर्गत आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर देखील कर सवलत मिळते.
गृहकर्जाच्या व्याजावर सूट मर्यादा 2 लाख रुपये आहे आणि शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर कर सवलत मर्यादा नाही.
म्हणजेच, तुम्ही भरलेल्या व्याजातून तुम्हाला पूर्ण सवलत मिळेल.
Web Title :- Tax Planning | 7 ways to save income tax sukanya samriddhi yojana senior citizen saving scheme ppf ulip 80c hra lta home loan interest
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्यांचे हात-पाय तोडा, 2-4 महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता’