कामाची गोष्ट ! आता खासगी कर्मचार्‍यांसाठी देखील येतेय ‘कर’ वाचवण्याची स्कीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून LTC बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी LTC मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार कॅश व्हाउचर्सची सुविधा देणार आहे. या कॅश व्हाउचरच्या मदतीने कर्मचाऱ्यांना नॉन फूड वस्तू खरेदी करता येणार आहेत. ज्यावर किमान १२ टक्के जीएसटी असेल. जर खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनसाठी LTA/LACच्या रकमेतून ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यास त्यामध्ये त्यांना करसवलत देखील मिळणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा देखील या करामध्ये फायदा होणार आहे. तशी व्यवस्था करण्यात आली आहे लवकरच याची माहिती दिली जाईल.

या योजनेच्या माध्यमातून सरकारला कोरोनामुळे पडलेल्या अर्थव्यवस्थेत उभारी देण्यासाठी ग्राहकांची मागणी वाढवण्यात येणार आहे. म्हणून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही या योजनेत समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे बाजारात ग्राहकांची 28 हजार कोटींची अतिरिक्त मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्राहकांची मागणी आणि भांडवली खर्च वाढवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सोमवारी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये LTC ऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांना कॅश व्हाउचर्स देण्याच्या योजनेचा समावेश आहे. या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी 31 मार्च 2021 पर्यंत वस्तू किंवा सेवा खरेदी करू शकतात,ज्यांच्यावर १२ टक्क्यांहून अधिक GST असणार आहे.

खाजगी क्षेत्रात 4 वर्षांत 2वेळा सुट
खासगी क्षेत्रात LTVवर चार वर्षांत दोनदा आयकर सूट दिली जाते.पण यासाठी कर्मचाऱ्यांना प्रवास केल्याचा पुरावा द्यावा लागतो.जर तो पुरावा नसेल तर त्यावर कर लावला जातो. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सचे (Institure of Chartered Accountants) माजी अध्यक्ष वेद जैन म्हणाले कि, सरकारला आयकर कायद्याच्या कलम 10 (5) मध्ये बदल करावा लागेल कारण त्यात करसवलतीवर बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून पुढील अर्थसंकल्पात ते बदलण्यात येईल.