जेजुरी : कोथळे येथे शिक्षकदिनानिमित शिक्षकांचा ‘सन्मान’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील विद्या महामंडळ प्रशाला येथे पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतरांचा सन्मान करण्यात आला.

कोथळे येथील विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी श्री. मल्हार शिक्षण मंडळाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर भोईटे, पी.एम.जगताप, वसंतआबा जगताप, संचालक आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंंग्रेसच्या महिलाध्यक्षा वंदना जगताप, तुषार खैरे, भगवान भोसले, पुरंदर नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक सतीश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जगताप, राहुल भोसले, दत्ताआबा भोईटे, माणिक जगताप, वैभव जगताप, राहुल जगताप, धीरज जगताप, अविनाश फडतरे, शुभम खेसे आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप तसेच पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेतरांचा सन्मान करण्यात आला.

श्री मल्हार शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी कोषाध्यक्ष व माजी सरपंच वसंतआबा जगताप यांनी मार्गदर्शन केले.