WhatsApp Tips and Tricks : तुम्हाला माहिती आहेत का ‘या’ 5 मजेशीर ‘ट्रिक्स’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp वापरकर्त्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. या अ‍ॅपमध्ये १.५ बिलियन मासिक सक्रिय युजर्स आहेत. जे लोक WhatsApp वापरतात त्यांना या अ‍ॅपबद्दल जवळजवळ सर्व काही माहित असेल. पण अशा काही ट्रिक्स आहेत ज्या प्रत्येकालाच माहित नसतात. कारण WhatsApp वर अनेक हिडन फीचर्स आहेत ज्याबद्दल प्रत्येक वापरकर्त्याला माहिती नसते. या जाणून घेऊया अशा ५ ट्रिक्सबद्दल, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

१. नंबर सेव्ह न करता कोणालाही करा मेसेज : WhatsApp वर नंबर सेव्ह केल्याशिवाय मेसेज करता येऊ शकतो, हे तुम्हाला माहित आहे. जर तुमच्याकडे कोणताही नंबर सेव्ह नसेल तर काही स्टेप्स फॉलो करून मेसेज करू शकता.

२. WhatsApp वर याप्रकारे पाठवा आपले लोकेशन : तुम्ही तुमचे लोकेशन तुमच्या मित्रांसह सामायिक करू शकता. हे अगदी सोपे आहे. यासाठी तुम्हाला ज्याला लोकेशन पाठवायचे आहे त्याच्या चॅट विंडोवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला खालील मेसेज विंडोमध्ये अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला लोकेशनचा पर्याय मिळेल. येथून तुम्ही कोणालाही आपले करंट किंवा लाइव्ह लोकेशन पाठवू शकता. लोकेशन किती वेळ सामायिक केले जाईल हे देखील सेट करू शकता. तुम्ही १५ मिनिटे, १ तास आणि ८ तास यामधील पर्याय निवडू शकता.

३. याप्रकारे करा टेक्स्टला बोल्ड, अंडरलाइन आणि इटालिक : WhatsApp वर चॅट करताना जर तुम्हाला एखादा शब्द बोल्डमध्ये लिहायचा असेल तर टेक्स्टच्या मागे-पुढे * हे लावा. तसेच इटालिकसाठी टेक्स्टच्या मागे-पुढे _ लावावे लागेल. अंडरलाइन करण्यासाठी टेक्स्टच्या मागे-पुढे ~ हे लावावे लागेल.

४. WhatsApp वर कोणालाही अशा प्रकारे करा ब्लॉक : जर तुम्हाला कोणाला WhatsApp वर ब्लॉक करायचे असेल तर त्याच्या चॅट विंडोवर जाऊन वर दिलेल्या तीन डॉट आयकॉनवर टॅप करावे. यानंतर More वर जाऊन Block वर टॅप करावे लागेल. तसेच जर तुम्ही नंबर सेव्ह नसेल केला तर तुमच्या चॅट विंडोमध्येच खाली किंवा वरच्या बाजूला ब्लॉकचा पर्याय दिसतो. यावर टॅप करा.

५. WhatsApp वर अशाप्रकारे लपवा लास्ट सीन : जर तुम्हाला तुमच्या मित्रांपासून तुमचा लास्ट सीन लपवायचा असेल तर वर दिलेल्या तीन डॉट आयकॉनवर टॅप करा. नंतर सेटिंग्समध्ये जाऊन अकाउंट्स प्रायव्हसी वर जा. यानंतर लास्ट सीनवर जाऊन Everyone, My contacts Nobody चा पर्याय निवडा.