BSNL यूजर्सला 97 रुपयाच्या रिचार्जमध्ये मिळतोय दररोज 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्याइतर फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारताची सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने ग्राहकांसाठी आतापर्यंत अनेक प्लॅन सादर केले आहेत. कंपनीकडे यूजर्ससाठी एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन आहेत जे अनेक बेनिफिट्ससह आहेत. अशाच एका प्लॅनबाबत आम्ही माहिती देणार आहोत जो कमी किंमतीत 2जीबी डेली डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. या प्लॅनची किंमत आणि या अंतर्गत मिळणार्‍या बेनिफिट्सबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

बीएसएनएलचा 97 रुपयेवाला प्लॅन

बीएसएनएलने आपल्या यूजर्ससाठी 97 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 18 दिवसांची आहे आणि या प्लॅन अंतर्गत मिळणार्‍या सुविधांचा लाभ 18 दिवसांपर्यंत घेता येतो.

या प्लॅनमध्ये मिळतील अनेक बेनिफिट्स

बीएसएनएलच्या 97 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलायचे तर या अंतर्गत यूजर्सला डेली 2जीबी डाटाचा लाभ मिळेल. म्हणजे यूजर्स 18 दिवसाच्या व्हॅलिडिटीदरम्यान एकुण 96जीबी डाटाचा लाभ घेऊ शकतात. 2जीबी डेली डाटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन 80केबीपीएस होतो. याशिवाय अन्य बेनिफिट्सबाबत बोलायचे तर यामध्ये यूजर्स अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. ज्यामध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगचा समावेश आहे. इतकेच नव्हे, प्लॅन अंतर्गत यूजर्सला डेली 100 एसएमएस एकदम मोफत दिले जात आहेत.

बीएसएनएलने बंद केले चार नवीन प्लॅन

बीएसएलएने एकीकडे यूजर्ससाठी 97 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केलेला असताना दुसरीकडे कंपनीने यूजर्सला झटका देत चार चांगले प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 47 रूपये, 109 रुपये, 998 रुपये आणि 1098 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. परंतु आता यूजर्स या प्लॅनचा वापर करू शकणार नाहीत. 47 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि 14जीबी डाटा उपलब्ध केला जात होता. हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध होता. तर 109 रुपयांच्या प्लॅनमध्ये सुद्धा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात होती.