दिलासा नाहीच ! 2020 पर्यंत ‘आऊटगोइंग’ कॉलसाठी द्यावे लगणार 6 पैसे प्रति मिनिट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्रायने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत एका नेटवर्कवरून इतर नेटवर्कवर कॉल करताना प्रती मिनिट 6 पैसे आकारण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. ट्रायनं आपल्या विधानात सांगितलं होतं की, वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर सहा पैसे प्रतिमिनिट टर्मिनेशन शुल्क 31 डिसेंबर, 2020 पर्यंत आकारलं जाणार आहे. पहिल्यांदा हा शुल्क प्रतिमिनिट 14 पैसे आकारला जात होता. 2017 पासून मात्र हा शुल्क सहा पैशांवर आणण्यात आला होता.

ट्रायनं या शुल्क वसुलीची मुदत एका वर्षानं वाढवली आहे. वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क एक जानेवारी 2021 पर्यंत संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ट्रायच्या या निर्णयाचं सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) नं स्वागत केलं आहे. सीओएआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू म्हणाले, ट्रायचं हे पाऊल योग्य दिशेनं पडलं आहे. COAI नं दूरसंचार क्षेत्रातील गंभीर वित्तीय तणाव दूर करण्यासाठी आम्ही सरकार आणि नियामकांसोबत असल्याचं सांगितलं आहे.’

जीओला मोठा झटका
ट्रायच्या या निर्णयाने जीओला मोठा झटका बसला आहे. कारण आयुसी शुल्क हा काही महिन्यांसाठी आकारला जाणार असल्याचे जिओने सांगितले होते. त्यामुळे 2020 पर्यंत जीओला हा शुल्क काढता येणार नाही. त्याउलट एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग करता येते. त्यामुळे आता जिओच्या ग्राहकांवर यांचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/