Tejashree Pradhan | अभिनेत्री तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या पोस्टमधील कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “तुला तुझ्या स्वतःबद्दल अभिमान……”

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचली होती. तेजश्रीने आपल्या अभिनयाने त्याचबरोबर आपल्या स्मित हास्य आणि सौंदर्याने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तेजश्रीनी (Tejashree Pradhan) ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिची ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. सध्या तेजश्री तिने शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आहे.

तेजश्री प्रधान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजश्री चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. सध्या तिने instagram वर तिचा एक फोटो शेअर केला असून त्या फोटोला तिने दिलेले कॅप्शन सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

तेजश्रीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती नो मेकअप लुक मध्ये दिसत आहे. यावेळी ती एकटक पाहताना आणि स्मितहास्य देताना दिसत आहे. फोटो शेअर करते तिने कॅप्शनमध्ये म्हटले, “तुला तुझ्या स्वतःबद्दल अभिमान असायला हवा…. कारण तू तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ एकट्याने घालवला आहेस. ज्यावेळी इतर सर्वांना तू ठिक आहेस, असं वाटतं होतं”. सध्या तेजश्रीच्या (Tejashree Pradhan) या फोटो सोबतच तिने दिलेले कॅप्शन देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

या फोटोवर अनेकांनी काळजीपूर्वक प्रश्न विचारत तिची विचारपूस केली आहे. तर तिच्या फोटोवर एका युजरने
“काय झाले इतके उदास व्हायला इतका उदास होऊ नका मॅडम…. तुम्ही इतक्या अ‍ॅक्टिव्ह आहात.
मी बऱ्याच तुमच्या मालिका आणि शो पाहिले आहेत नेहमी आनंदित रहा” असा सल्ला देखील दिला आहे.
तेजश्रीने आजवर अनेक मालिका, चित्रपट यातून आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.
तेजश्री प्रधान हीने सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.
तेजश्रीची प्रत्येक भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

Web Title :- Tejashree Pradhan | marathi actress tejashri pradhan share emotional post on instagram caption viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paresh Rawal | ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाचा टीझर शूट संपन्न; चित्रपटात पाहायला मिळणार अनेक ट्विस्ट

Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?