Video : महिला पोलीस अधिकाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण

असीफाबाद (तेलंगणा) : वृत्तसंस्था – वृक्षारोपणाचे काम सुरु असताना काही नागरिकांनी वनविभागाच्या कर्मच्याऱ्यांवर हल्ला केला. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत असताना नागरिकांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये महिला अधिकारी जखमी झाल्या आहेत.

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समीतीच्या वतीने सरकाने राज्यात वृक्षारोपणाचे काम सुरु आहे. यासाठी वन विभागाची मदत घेतली जात आहे. वन विभागाच्या मदतीने राज्यामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे. दरम्यान असीफाबाद जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण सुरू असताना काही लोकांनी वन विभाग आणि पोलिसांवर हल्ला चढवला. मिळालेल्या माहितीनुसार हि घटना शनिवारी (दि.२९) घडली असून, याचा व्हिडीओ समोर आला आहे. सुत्रांनुसार हल्ला करणारे सत्ताधारी पक्षाचे कार्य़कर्ते होते.

व्हीडीओमध्ये महिला पोलीस अधिकारी लोकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, नागरिक महिला पोलीस अधिकाऱ्याला चप्पल आणि काठीने मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी अधिकाऱ्यांनाच लोक काठीने मारत असल्याचे पाहून पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज सुरु केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

‘गवार’ खाल्याने अनेक आजारांवर राहते नियंत्रण 

सकाळी उठल्यानंतर ‘पाणी’ पिल्याने होतात ‘हे’ फायदे 

आवडीने खाल्लं जाणारं ‘बिस्कीट’ आरोग्यासाठी धोकादायक 

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’

अखेर कॉंग्रेस वंचितसमोर ‘झुकले’, बैठकित वंचितला सोबत घेण्यावर शिक्कामोर्तब

 

You might also like