Coronavirus : ‘कोरोना’मुळं तेलंगणा सरकारनं ‘महाराष्ट्रा’च्या सर्व ‘सीमा’ केल्या ‘सील’, उभारलं ‘चेकपोस्ट’

पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशात करोनाग्रस्तांची संख्या 298 वर पोहचली आहे. मागील 24 तासात देशामध्ये कोरोनाचे तब्बल 98 रुग्ण आढळून आले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून महाराष्ट्रात आतापर्यंत 63 करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना संशयित रुग्ण महाराष्ट्राच्या हद्दीतून तेलंगणात येऊ नये यासाठी महाराष्ट्र-तेलंगणा सीमा सील करण्याचा निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतला आहे.

तेलंगणा सरकारने सीमेवर तब्बल आठरा चेकपोस्ट उभारल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्राला लागून असेलेल्या सगळ्या राज्यांच्या सीमेवर कोणतेही चेकपोस्ट नाहीत. त्यामुळे इतर राज्यातून कोरोनाचे संशयीत रुग्ण महाराष्ट्रात आले तर काय होईल असा प्रश्न सीमावर्ती भागातील जनतेला आहे. महाराष्ट्रातून होणारी संशयीताची घुसखोरी रोखण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना संसशयिताची तपासणी करण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी तेलंगणाने महाराष्ट्र सीमेवर 18 चेकपोस्ट उभारले आहेत. महाराष्ट्राच्या हद्दीत तेलंगणासह इतर राज्यातून येणाऱ्या संशयीत रुग्णासंदर्भात कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये रविवारी 24 तासांचा कर्फ्यू राहणार आहे. सकाळी सहा ते सोमवारी सहापर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे. त्यामुळे मेट्रोसह परिवहन सेवाही पूर्णपणे बंद असणार असल्याची माहिती मुख्यमंत्री केसीआर यांनी दिली आहे.