मंदिराच्या पुजाऱ्याने केली मुलींशी छेडछाड

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील खडकी भागातील मंदिराच्या पुजाऱ्याने दोन मुलींशी छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. वय वर्षे ७ आणि ११ वर्षाच्या या मुली आहेत. मंदिरात खेळण्याच्या बहाण्याने हा पुजारी मुलींना बोलवायचा आणि त्यांच्याशी गैरवर्तन करायचा . या पुजाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, खडकी बझार येथे असलेल्या मारुती मंदिरातील पुजारी हेमंत रामचंद्र काटेकर (65) .हा मुलींना खेळण्याच्या निमित्ताने बोलवायचा आणि त्यांना एका खोलीत नेऊन छेडछाडीचे प्रकार करायचा . याची माहिती जेव्हा मुलीनी त्यांच्या आईला सांगितली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर मुलींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आसिफाच्या आणि या आताच्या घटनेनंतर मंदिरं देखील सुरक्षित नाहीत असे वाटू लागले आहे.