टेनिसचा बादशाह राफेल नदाल पुन्हा एकदा विनयशील    

लंडन :वृत्तसंस्था

टेनिसचा बादशाह म्हणून ओळख असलेला स्पेनच्या राफेल नदाललने  चक्क इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत राफेल नदालला  पराभव पत्करावा लागला होता. हि लढत  विम्बल्डन स्पर्धेच्या इतिहासातील ही एक रोमांचक आणि सर्वांच्या लक्षात राहणारी  लढत ठरली आहे.त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावरचर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी  मात्र त्याच्या खेळामुळे नाही किंवा त्याच्या पराभवामुळे नाही तर त्याच्या विनयशीलतेमुळे तो चर्चेत आहे.

[amazon_link asins=’B077PW9ZRG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ef20531-8be4-11e8-bfe0-ffe7f40f4966′]

टेनिसचा हा स्टार खेळाडूने विमानातून चक्क इकोनॉमी क्लासमधून प्रवास केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याने बार्सिलोना ते मॅनकोर हा प्रवास सर्व -सामान्य प्रवाशांसोबत केला आहे. एअर युरोपाच्या विमानात एक्सिट दरवाजा शेजारील सीटवर बसून नदाल पेपर वाचत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनी त्यांनतर नदालची भरभरून प्रशंसा केली.सर्व सोशल मीडियावरून त्याच्यावर  कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विम्बल्डनच्या उपांत्या फेरीत जोकोव्हिचने ६-४, ३-६, ७-६, ३-६,१०-८ अशा फरकाने नदालला पराभूत केले. नदाल हा जगातील सर्वोत्तम  टेनिस खेळाडू आहे असे मत जोकोव्हिचनेही व्यक्त केले होते. नदालविरूद्धच्या जयपराजयाच्या आकडेवारीत जोकोव्हिच २७-२५ असा आघाडीवर आहे. फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंत सेलेब्रिटींमध्ये किंग ऑफ क्ले नदाल ७२ व्या स्थानावर आहे. त्याचे एकूण उत्पन्न ४१.४ कोटी अमेरिकन डॉलर इतके आहे.