दुर्देवी ! अमरावती-नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात 2 शेतकर्‍यांचा मृत्यू तर दोघे जखमी

अमरावती/तिवसा: अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ चारा आणण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रक धडक दिल्याने दोन शेतकरी ठार तर दोन जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडला . कैलास हुंडीवाले (वय ४०) व हुंडाआप्पा बहीहट (वय ५५) अशी मृत शेतकऱ्याची नावे आहे. तर संजय दिवटे व मुकेश बिरकट असे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

तिवसा तालुक्यातील दिवानखेड येथून हे शेतकरी शेतात जनावरांसाठी चारा आणायला नागपूर दिशेने निघाले होते. शिवनगाव जवळ पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या ट्रॅकटरला जोराची धडक दिली. धडकेट ट्रॅक्टरची ट्राली पलटी झाली यात दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दोन जखमींना अमरावती ज़िल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत.