Terrorist Arrest In Pune | अटक केलेल्या 4 दहशतवाद्यांकडील तपासात महत्वाची माहिती आली समोर, देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Terrorist Arrest In Pune | महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) घातपात प्रकरणी चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत आज (शनिवार) संपल्याने त्यांना विशेष अतिरिक्त न्यायाधीश व्ही.आर. कचरे (Special Additional Judge V.R. waste) यांच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाकडून हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने चार दहशतवाद्यांच्या पोलीस कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. यावेळी महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चार दहशतवाद्यांच्या चौकशीत ते इसिस (ISIS) आणि अल सुफा (Al Sufa) या बंदी घातलेल्या संघटनेशी (Terrorist Organizations) संबंधित असून देशभरातील बॉम्बस्फोटाचा (BOMB BLAST) संपूर्ण कट उघडकीस आल्याची माहिती दिली. (Terrorist Arrest In Pune)

पुणे पोलिसांनी (Pune Police) 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड (Pune Crime News) परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकुब साकी Mohammad Yunus Mohammad Yakub Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे. ते एनआयए (National Investigation Agency (NIA) शोध घेत असलेले दहशतवादी असल्याचे तपासात स्पष्ट झाले. (Terrorist Arrest In Pune)

पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांचा (Terrorists Arrested in Pune) ताबा महाराष्ट्र एटीएसने घेऊन त्यांची
सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलामध्ये बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. या दोघांना पुण्यातील कोंढवा भागात राहण्यासाठी खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण Abdul Qadir Dastgir Pathan (वय 32, रा, कोंढवा) याला तसेच आर्थिक मदत (Financial Supply) करणारा रत्नागिरी येथील मेकॅनिकल इंजिनिअरला (Mechanical Engineer) सिमाब नसरुद्दीन काझी Simab Nasruddin Qazi (वय 27, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढरी रत्नागिरी) याला अटक केली. या दहशतवाद्यांनी पुण्यासह काही शहरात घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटात झुल्फिकार अली बडोदावाल्याचा (Zulfikar Ali Barodawala) सहभाग निष्पन्न झाल्यावर त्याला देखील एटीएसने ताब्यात घेतले.

झुल्फिकार अली बडोदावाला याने मोहम्मद खान आणि मोहम्मद साकीला पठाण व काझीच्या माध्यमातून दहशतवादी कारवाईसाठी आर्थिक मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.
त्यामुळे एटीएसने त्याला एनआयच्या गुह्यातून वर्ग करून घेतले आहे.
आयसिस च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळ्यात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रिय होता.
याप्रकरणी एनआयए च्या पथकाने बडोदावाला याच्या चार साथीदारांना अटक केली होती.
न्यायालयात याबाबत सरकारी पक्षातर्फे ॲड. विजय फरगडे (Adv. Vijay Fargade) तर बचाव पक्षातर्फे
ॲड. यशपाल पुरोहित (Adv. Yashpal Purohit) यांनी युक्तिवाद केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Digambar Darade | लंडन, सिगांपूर, जर्मनीतही ऋषी सुनकचा डंका ! पत्रकार दिगंबर दराडेंचे पुस्तक सिंगापूरच्या ग्रंथालयात