Digambar Darade | लंडन, सिगांपूर, जर्मनीतही ऋषी सुनकचा डंका ! पत्रकार दिगंबर दराडेंचे पुस्तक सिंगापूरच्या ग्रंथालयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Digambar Darade | ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. तीन महिन्यांमध्ये तब्बल सहा आवृत्या निघाल्या आहेत. हे पुस्तक हिंदी, इंग्लिश, भाषेत आले आहे. हिंदी पुस्तकाला देशातून मागणी वाढत आहे. तर लंडन, सिंगापूर, सह जर्मनीत इंग्लिश पुस्तकाने बाजी मारली आहे. (Digambar Darade)

लवकरच कन्नड, गुजराथी, बंगालीसह जर्मन भाषेतही काढण्यात हे पुस्तक काढण्यात येणार आहे. लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच् विविध पैलू उलगडले आहेत. लंडन येथे राहत असलेले केदार लेले म्हणाले, ऋषी सुनक यांच्या जीवनावरील पुण्यातील पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिले इंग्लिशमधील पुस्तक खूप वाचनीय झाले आहे. लंडन मधील मराठी माणसांच्यामद्ये देखील या पुस्तकाची चर्चा सुरू आहे. मला खात्री आहे हे पुस्तक जागतिकस्तरावर वाचले जाईल. दराडे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान साध्या सोप्या शब्दात मांडले आहेत. ब्रिटिश लोकदेखील हे पुस्तक वाचण्यासाठी मागत आहेत. ही संख्या खूप वाढेल असा मला विश्वास वाटतो.

जर्मनीतील जीवन करपे म्हणाले, ऋषी सुनक यांच्या जीवनावरील पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिले इंग्लिशमधील पुस्तक मला आवडले. ऋषी सुनक यांची जीवनकथा खरेच फार प्रेरणादायी आहे.एका भारतीय वंशाचा माणसाचा सर्वोच्च पदावर जाऊन पोहचण्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो सर्वच धडपडणाऱ्या भारतीय तरुणांसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत बनून राहिला आहे. दराडे यांचे पुस्तक जीवनातील सुरुवातीच्या संघर्षमय पर्वाची कहाणी आहे. हे पुस्तक वाचत राहवे वाटते. हे पुस्तक जर्मनमध्येही येत आहे. याचा आनंद आहे. (Digambar Darade)

महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे अध्यक्ष सचिन गंजापूरकर म्हणाले, ऋषी सुनक यांच्या जीवनावरील दिगंबर दराडे यांचे पुस्तक सिंगापूरच्या मराठी ग्रंथालयामध्ये ठेवले आहे. तरूणांच्यामध्ये सुनक यांची वेगळी केझ आहे. इंग्लिश पुस्तक जागतिक पातळीवर उपलब्ध होणे आवश्यक आहे

युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद असलेयाचे दिगंबर दराडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, युवक आणि युवतीकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लंडनमध्ये राहत असलेल्या आणि तिकडे शिक्षण पूर्ण करून आलेल्या तरूणांच्याकडून या पुस्तकाचे विशेष कौतुक होत आहे.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले
त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच
फुलून येत आहे.


एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे,
गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे.
आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत

राजकीय नेत्यांच्या सोशल मिडियावर ऋषी

कमी वयात यशस्वी झालेल्या ऋषी सुनक यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून ते पंकजा, धनंजय मुंडे, उदयनराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील,
उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहित पवार यांच्या सोशल मिडियावर ही या पुस्ताकाची पोस्ट पहायला मिळाली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ओळख लपवून मुलींशी लग्न अन् धर्मांतर…’, लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (व्हिडीओ)

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर