रेकाॅर्डवरील गुन्हेगारांसह दहशतवाद्यांचा पाठलाग होणार सोयीस्कर!

कोल्हपूर : पाेलीसनामा ऑनलाईन

कोल्हपूर शहर पोलीस दलाने गुन्हेगारांसह दहशतवाद्यांचा पाठलाग करण्यासाठी एक नविन साॅफ्टवेअर प्रणाली विकसीत केली आहे. त्याद्वारे कोल्हापूर शहरासह ग्रामिण भागतील हाॅटेल, लाॅजिंग, बोर्डिंग, सायबर कॅफे, जुने वाहन खरेदी- विक्री करणारे व्यावसायिकांकडे येणारे ग्राहक यांच्या नोंदी त्यांचे साॅफ्टवेअर प्रणालीद्वारे थेट पोलीस विभागास प्राप्त होणार आहेत. पोलीस विभागाकडे असणारे क्राईम डेटाशी सिंक्रोनाईझेशन करुन गुन्हेगारांचा शोध व त्यांचा माग काढण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18c9baa0-8907-11e8-8cd5-c19223a52325′]

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व सदर कंपनीद्वारे शहरातील सर्व निवासी हाॅटेल, सायबर कॅफे, इस्टेट एजंट व वाहन खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक यांना यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे. त्यामुळे हाॅटेलमध्ये आलेला ग्राहक व त्यांचे सोबती जर क्राईम रेकाॅर्डवर असतील, वाॅटेंड आरोपी असतील, किंवा दहशतवाद्यांच्या लिस्टमधील असतील तर त्यांची माहिती पोलीस कंट्रोल रुमला मिळणार आहे. त्यामुळे अनेक अनर्थ टाळण्यास मदत होणार आहे. यामुळे गुन्हेगार मुक्त शहर ही संकल्पना सत्यात उतरण्यास मोलाची मदत होणार आहे.

ही कार्यप्रणाली स्मार्टफोनवरही कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यप्रणालीला सिटी व्हिजीटर्स इन्फाॅरमेशन रेकाॅर्ड मॅनेजमेंट सिस्टीम (सी. व्ही. आय. आर. एम. एस.) असे नाव देण्यात आले आहे. या कार्यप्रणाली द्वारे कोणता ग्राहक कसा आहे? त्याचे क्राईम रेकाॅर्ड काय आहे? तो वाॅंटेड आरोपी किंवा गुन्हेगार आहेत का? याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. तसेच अशा गुन्हेगारांचे ट्रॅक रेकाॅर्डही जतन करता येणार आहे. ही कार्यप्रणाली आेटीपी द्वारे कोड जनरेट करुन लाॅगईन करणारी असल्यामुळे ती सुरक्षीत व सोपी आहे.
[amazon_link asins=’B01MRJQSXK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1ec2cf6b-8907-11e8-9a2a-2fdbe3d7ef38′]
यावेळी कार्यक्रमास कोल्हापूर शहरातील 100 ते 125 हाॅटेल व लाॅजींग व्यावसायिक उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सध्याच्या आधुनिक युगातील कार्यप्रणालीचे महत्व पटवून दिले.