‘ठाकरे’ चित्रपटाने १ आठवड्यात कमावले ‘एवढे’ कोटी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाची पहिल्या आठवड्याची कमाई समोर आली आहे. त्याद्वारे निश्चितच हा चित्रपट यशस्वी झाला असल्याचे आपणास पाहण्यास मिळते आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाची पहिल्या आठवड्यातील कमाई तब्बल ३१.६० कोटी एवढी आहे. पहिल्या तीन दिवसात चित्रपटाने २३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  ‘ठाकरे’ चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘ठाकरे’ चित्रपटने प्रदर्शनच्या पहिल्याच दिवशी सहा कोटी रुपयांची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी ठाकरे चित्रपट १० कोटींवर गेला होता. तिसऱ्या दिवशी या चित्रपटनाने ६.९० रुपयांची कमाई केली आणि तीन दिवसाची एकूण कमाई २३ कोटींच्या घरात गेली आहे.

ठाकरे चित्रपटाच्या सोबतच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मणिकर्णिका चित्रपटामुळे ‘ठाकरे’ चित्रपटाच्या कमाईवर परिणाम करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र अंदाज ठाकरे चित्रपटाने सपशेल खोटा ठरवला आहे. कारण ठाकरे चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यात यशस्वी ठरला आहे. कमाईच्या तुलनेत बोलायचे झाल्यास मणिकर्णिका चित्रपटाने बाजी मारली आहे असे दिसते आहे.

मणिकर्णिका चित्रपट हिंदी ,तमिळ आणि तेलगू तीन भाषेत प्रदर्शित करण्यात आला असल्याने तो तीन हजार चित्रपटगृहांच्या पडद्यावर प्रदर्शित झाला. तर ठाकरे चित्रपट दोन हजार चित्रपटगृहांच्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. मणिकर्णिका चित्रपटाची पहिल्या तीन दिवसाची कमाई ४२.५५ कोटी एवढी झाली असून पाच दिवसात या चित्रपटाने ५० कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.