Thane City Police | ठाणे शहर पोलीस दलात मोठे फेरबदल, वरिष्ठ निरीक्षकांसह 9 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane City Police | ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात (Thane City Police Commissionerate) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कोपरी पोलीस ठाण्याच्या (Kopri Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसुझा (Senior Police Inspector D’Souza) यांच्यासह आयुक्तालयातील 12 अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव (Addl CP Sanjay Jadhav) यांनी बुधवारी (दि.8) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्याचे आदेशात नमूद केले आहे. (Thane City Police)

 

कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डिसुझा हे गेल्या दीड-दोन महिन्यांपासून आजारपणामुळे रजेवर आहेत. त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून कापूरबावडी पोलीस ठाण्याचे (Kapurbavadi Police Station) पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर (Police Inspector Sanjay Nimbalkar) यांची बदली करण्यात आली होती. परंतु ते देखील दोन दिवसांपासून रजेवर गेले. दरम्यान डिसुझा यांची ठाणे शहर नियंत्रण कक्षात (City Control Room) बदली केली आहे तर निंबाळकर यांनी पुन्हा कापूरबावडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

 

डिसुझा यांच्या जागेवर खंडणी विरोधी पथकाचे (Anti Extortion Cell)
पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे (Police Inspector Sudhakar Humbe) यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
तसेच बाजारपेठचे पोलीस निरीक्षक सुधाकर खोत (Police Inspector Sudhakar Khot) यांची वाहतूक शाखेत (Traffic Branch)
तर वाहतूक शाखेचे तुकाराम पवळे, शहाजी शिरोळे आणि सुखदेव पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
भिवंडी शहरचे नितीन पाटील यांची गुन्हे शाखेत (Crime Branch) बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title :- Thane City Police | Major reshuffle in Thane city police force, transfers of 9 police officers including senior inspectors

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mundhwa Premier League Cricket Tournament |‘मुंढवा प्रिमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा ! महाराणा रॉयल्स् संघाला विजेतेपद

Ahmednagar ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना महिला वैद्यकीय अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस