Thane Crime News | ठाण्यात शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची फेरीवाल्याकडून हत्या; फेरीवाल्यांच्या वादातून केली हत्या

ठाणे : Thane Crime News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मतदारसंघातील जांभळीनाका येथील उपविभागप्रमुख रवींद्र परदेशी (Rabindra Pardeshi) यांच्या डोक्यात चॉपरसारख्या हत्याराने वार करुन त्यांची हत्या (Murder) करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. (Thane Crime News)

रवींद्र परदेशी (वय ४८, रा. खारकर आळी, ठाणे) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. परदेशी याची नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती केली होती. त्यांच्यावर जांभळी नाका येथील शिवसेनेच्या (Shivsena) उपविभागप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. ठाण्यातील मुख्य बाजार पेठेत त्यांचा कटलरीचा व्यवसाय आहे. (Thane Crime News)

काही दिवसांपासून परदेशी यांचा काही फेरीवाल्यांशी वाद सुरु होता. परदेशी हे रविवारी रात्री १० वाजता घरी जात होते.
यावेळी गाडीवरुन आलेल्या दोघांनी त्यांना अडवून डोक्यात चॉपरने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने ज्युपीटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.
पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title :-  Thane Crime News | Shiv Sena Sub-Division Chief Ravi Pardeshi killed by a hawker in Thane; The hawkers were killed due to a dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mohan Joshi On Chandrakant Patil | चंद्रकात पाटील यांना मंत्रीमंडळातून बडतर्फे करा ! मोहन जोशी यांची मागणी; न्यायालयाने सरकारला दंड केल्याचे प्रकरण

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना