Thane Gang Rape | नराधम प्रियकराने प्रेयसीला केलं मित्रांच्या स्वाधीन, ठाण्यात चौघांकडून 26 वर्षीय युवतीवर कारमध्ये आळीपाळीनं बलात्कार

ठाणे :पोलीसनामा ऑनलाइन – Thane Gang Rape | काही दिवसांपूर्वी ठाण्याजवळ असलेल्या डोंबिवली (Dombivli) येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच ठाण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर चार मित्रांनी सामूहिक बलात्कार (Thane Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी (दि.19) कासारवडवली पोलीस ठाण्यात (kasarvadavali police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन (FIR Lodged) आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली आहेत.

 

गोविंद राजभर Govind Rajbhar (वय-32) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर 26 वर्षीय पीडित ठाण्यातील एका बारमध्ये वेटर म्हणून काम करते. आरोपी हा नेहमी या बारमध्ये येत होता. याठिकाणी आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत मैत्री वाढवत तिला लग्नाचे आमिष दाखवले.

 

आरोपी गोविंदने पीडित तरुणीला नवीन घर खरेदी करायचे असल्याचे सांगून तिच्याकडून 7 लाख 55 हजार रोख आणि दागिने घेतले. त्यानंतर तरुणीला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध (Thane Gang Rape) ठेवले होते. यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडीओ काढले (Shoot obscene videos) होते. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर घोडबंदर येथील एका हॉटेलमध्ये पुन्हा लैंगिक अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला आपल्या इतर चार मित्रांच्या स्वाधिन केलं.

आरोपीच्या मित्रांनी पीडित तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार (Thane Gang Rape) केला.
हा धक्कादायक प्रकार 1 फेब्रुवारी 2019 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडल्याचे पीडित तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी गोविंद राजभर याच्यासह त्याच्या इतर तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Web Title :- Thane Gang Rape | boyfriend handed over his 26 years old girlfriend to his four friends they gang raped her in car thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shivsena MP Bhavana Gawali | …म्हणून शिवसेना खासदार भावना गवळी आज ED कार्यालयात हजर राहणार नाहीत

Pune Corporation | पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट, दुकानांच्या वेळेबाबत सुधारीत आदेश जारी; जाणून घ्या वेळा

Mumbai Crime | मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 21 कोटीच्या हिरोईनसह महिला तस्कर गजाआड