… अन् त्यावेळी एका महिलेनं ‘किंग’ खान शहारूखच्या कानशिलात लगावली

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हा तेव्हाचा किस्सा आहे जेव्हा शाहरुख खान पहिल्यांदाच मुंबईला आला होता. तेव्हा शाहरुखला हे माहित नव्हते की, दिल्ली वरुन जी रेल्वे येणार आहे ती मुंबईला पोहचल्यावर किंवा बोरीवली नंतर एक प्रकारे लोकल बनुन जाते. दिल्लीची लोकलट्रेन तर अशाप्रकारे चालत नव्हती.

ऐवढ्यात जो कोणी शाहरूखच्या जागेवर येऊन बसतो त्यावेळी शाहरुख व त्याचे मित्र त्यांना सांगतात की, ही जागा आम्हची आहे. आमचे आरक्षण आहे. त्यावेळी शाहरुख व त्याच्या 4 ते 5 मित्रांना बघून लोकं तेथून निघून जातात. पुढे तेथे एक महिला पोहचते त्यावेळी तिच्या सोबत तिचा पती पण असतो. तेव्हा शाहरुखने त्या महिलेला पाहिले व आदराने आपल्या जागेवर बसण्यासाठी जागा दिली. मात्र तिच्या नवऱ्याला हे सांगून थांबवले की, तुम्ही नाही बसु शकत त्या महिला आहते, म्हणून त्यांना बसू दिले. ही जागा आमच्या नावाने आरक्षित आहेत. मी पैसे दिले आहेत. असे रागात शाहरुख बोलला.

नंतर मात्र वेगळेच घडले. ती महिला आपल्या जागेवरुन उठली व रागात तिने जोरदार शाहरुखच्या कानशिलात लावली. आणि म्हणाली शानपट्टी करू नका मला शिकवु नका, ही सर्वांची रेल्वे आहे. जागा सर्वांची आहे कोणी कुठे पण बसणार तुम्हाला काय करायचे आहे. मोठा आलास आरक्षण वाला. तेव्हा शाहरुखची बोलती बंद झाली. चुपचाप कोपरा पकडून बसला आणि विचार करायला लागला वा… मुंबई किती चांगले स्वागत केले.