मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार : संभाजी भिडे 

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

आत्म उन्नती,आत्म साक्षात्कार आणि आत्मउद्धार यासाठी जगले पाहिजे. भारत देश हा संन्यासाचा देश असून मनुष्य मनास जिंकू शकत नाही. मनाला जिंकण्याची कृती म्हणजे धर्माचार आहे. ते साध्य कसे होईल. याची शिकवण संतानी आपणास दिली आहे. अशा शब्दात श्री शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5976f757-81e6-11e8-831d-f9c26748560e’]

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुणे शहरात थोड्यावेळापुर्वीच आगमन झाले. या पालखीचे आणि वारकरी भाविकांचे स्वागतासाठी पुणेकर रस्त्यावर सज्ज आहेत. तर श्री शिवप्रतिष्ठान चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सालाबाद प्रमाणे यंदा देखील संचेती हॉस्पिटल पूल ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्या पर्यंत स्वयंसेवकासह सहभागी होणार आहेत.

आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संभाजी भिडे गुरुजी यांनी जंगली महाराज मंदिरात सर्व स्वयंसेवकांना तासभर मार्गदर्शन केले. त्यानंतर जंगली महाराज मंदिरापासून संचेती हॉस्पिटल जवळील पुलापर्यंत हजारो स्वयंसेवकासह पायी चालत आले. या दरम्यान  पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला. पोलीस बंदोबस्त ठेवण्यामागे मागील वर्षी शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते पालखीमध्ये सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6033f94d-81e6-11e8-8285-21384d91aec7′]

यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची प्रेरणा पुढील पिढीला मिळाली पाहिजे. यासाठी 1384 वजनाचे सोन्याचे सिहसन साकारले जाणार आहे. यासाठी 400 ते 500 कोटी किमतीचे सिंहासन असणार आहे. यासाठी प्रत्येक स्वयंसेवकाने राज्यातील प्रत्येक गावात पहाटेच्या सुमारास जावे. त्यासाठी प्रेरणा मंत्राचा लोक जागरण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. रायगडावर प्रत्येक दिवशी खडा पहारा देण्यासाठी 2 हजाराची एक तुकडी तयार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर त्या बाबतची प्रत्येकाने यादी 31 जुलैपूर्वी मला द्यावी. अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.