क्रिकेटपटूशी लग्न केल्यानंतर सोडून दिलं ‘या’ अभिनेत्रीनं करियर, आता मुलीसह मालदीवमध्ये करतेय ‘एन्जॉय’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटर्सशी लग्न केले आहे. त्यापैकी एक म्हणजे गीता बसरा. २००६ मध्ये गीता बसरा हिने बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. ‘दिल दिया है’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली परंतु मुख्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ शकली नाही.


एका क्रिकेटपटूशी लग्न करून तिने सोडले करियर :
चित्रपटांमध्ये अपयशी ठरल्यानंतर गीताचे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगशी २०१५ मध्ये लग्न झाले. यानंतर तिने चित्रपटांना निरोप दिला. त्यांनतर २०१६ मध्ये गीताने एका मुलीला जन्म दिला. दोघांनी आपल्या मुलीचे नाव हिनाया हीर ठेवले. याक्षणी, गीता आपल्या कुटुंबासह खूप आनंदित आहे. काही दिवसांपूर्वी गीता आणि हरभजन सोनी टीव्ही कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये देखील दिसले होते.

अलीकडेच गीता बसराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, जी प्रेक्षकांना खूपच आवडली असून ही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. गीता आपली मुलगी हिनायाबरोबर मालदीवमध्ये सुट्टीवर आहे. ही छायाचित्रे स्वत: गीताने सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. दोघांची बॉन्डिंग बरीच सुंदर दिसत आहे.


चित्रपट कारकीर्द :
‘दिल दिया है’ नंतर गीता बसरा इमरान हाश्मीसमवेत ‘द ट्रेन’ मध्ये दिसली होती. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर त्यांनी ‘जिल्हा गाझियाबाद’ मध्येही काम केले. बॉलिवूड व्यतिरिक्त ती पंजाबी चित्रपटांमध्ये ‘सेकंड हँड हसबँड’ आणि ‘लॉक’ मध्येही दिसली होती.