इयत्ता पहिली प्रवेशाचं वय सहाच वर्ष असणार: विनोद तावडे

नागपूर : पोलीसनामा आॅनलाइन
इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वर्षावरुन पाच वर्ष करणार नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना तावडे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
देशातील इतर बहुतांश राज्यात पहिली इयत्तेच्या प्रवेशाचं वय पाच वर्ष आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या राज्यातही पहिली प्रवेशाचं वय पाच वर्ष करावं, अशी मागणी सावंत यांनी केली होती.
[amazon_link asins=’B01NAKR1Z9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28c3f65c-8a83-11e8-a8a1-a367b5b8b5f3′]
नेमकं तावडे काय म्हणाले-
“सुरुवातीची काही वर्षे मुलं कुटुंबासोबत राहणं गरजेचं असतं. पण याच काळात मुलांना सहा-सहा तास बाहेर का ठेवायचं,” असा सवाल तावडेंनी विचारला. “आपण पहिली प्रवेशाचं वय जर 5 वर्ष केलं तर सीनिअर केजी, ज्युनियर केजीचं वय कमी होईल आणि पालक वयाच्या दुसऱ्या वर्षीच मुलांना नर्सरीत टाकतील. आपल्याला मुलांचं बालपण हरवण्याची इतकी घाई का झाली आहे,” असंही तावडे म्हणाले.
एवढेच नाही तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 1 लाख मुलांसाठी 14 लाख मुलांचं भवितव्य का धोक्यात घालायचं असे ही त्यांनी म्हटलं आहे. पहिलीचं वय 6 वर्ष केल्यामुळे स्पर्धा परीक्षेत नुकसान होत असल्याचा दावा विनोद तावडेंनी फेटाळला. तसेच  इतर  राज्यांनी पहिली प्रवेशाचं वय पाच वर्ष करुन कायदा मोडला, म्हणून आपण ते करणार नाही,” असं तावडेंनी स्पष्ट केलं.
[amazon_link asins=’B07F3ZCQ77′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’38b6250e-8a83-11e8-8508-6dd400ebfb76′]