बँकेसह कृषिकेंद्र फोडणारे चोरटे गजाआड

शिंदाड (पाचोरा) : पोलीसनामा ऑनलाईन – पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील बँक ऑफ बडोदा, दिशा कृषिकेंद्र व मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना गजाआड करण्यात आले आहे. जळगाव गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
शिंदाड येथीलच सागर विकास धनगर, सुनील उर्फ पिंटू विठ्ठल पाटील, रवींद्र अशोक जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना एलसीबीने मध्यरात्री अटक केली.

शिंदाड येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेचे चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. या सोबतच दिशा कृषिकेंद्र कुलूप तोडून ८ हजाराची चोरी केली होती. तसेच शिंदाड येथीलच मोटारसायकल चोरी व इतर परिसरातील भुरट्या चोऱ्या, रोटोव्हेटर चोरी अशा अनेक चोरीप्रकरणी एलसीबी पथकाने चोरीची मोटार सायकल पकडून माग काढला. त्यावेळी चोरटे हे शिंदाड येथीलच असल्याचे तपसात समोर आले आहे. सदर आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, नारायण पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे, अशोक पाटील, गफूर तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याची नोंद पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनला असल्याने आरोपींना पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाचोरा येथील कोर्टात आरोपींना हजर करण्यात आले असता न्यायालयाने २५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.