मेगा भरती रद्द केल्याने तरुणांचे नुकसानच

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईन

सरकारी मेगा भरती रद्द केल्याने अनेक तरुणांचे नुकसान होणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ed431ac-9958-11e8-a5c2-97e1efe7bd0d’]

मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असून तोपर्यंत सरकारी नोकर भरतीला स्थगिती दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी म्हटले आहे की, भरतीतील विलंबामुळे केवळ मराठाच नाही तर, इतर समाजातील तरुण, ज्यांची वयोमर्यादा ओलांडली जाईल, त्यांचे काय? असा सवाल चव्हाण यांनी केला.

मराठा आरक्षण देणारच आहात तर, ही भरती करण्यास हरकत काय? असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला. सध्याची वेळ राजकीय कुरघोडी करण्याची नाही अशी टीपण्णी त्यांनी केली. मुस्लीम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री गप्प का? अशीही विचारणा चव्हाण यांनी केली.