मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा तरूणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता एक महिना उलटला तरी गुन्हे मागे घेतलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री कार्यालय आणि गृह विभागाला दिले आहे. हे निवेदन परळी येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्यवक महेश डोंगरे यांनी दिले आहे.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0aca2bbb-a7b9-11e8-b077-137fe76e473b’]

परळीमध्ये १८ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान राज्यात उद्रेक निर्माण झाला होता. चाकण, पुणे, औरंगाबादसह राज्यातल्या अनेक भागात जवळ-जवळ दहा हजार कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला महिना होत आला तरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करत असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. आरक्षणाचा निर्णय झाल्याखेरीज शासकीय मेगा भरती करू नये, असेही निवेदनात म्हटले आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1209ca8c-a7b9-11e8-bde7-f5ca21f19030′]

मराठा आंदोलनकर्त्याचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाएकी गुन्हे मागे घेता येत नाहीत. गंभीर गुन्हे सोडून, इतर गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.