निर्भया केस : दोषींना कशामुळं घालण्यात आले लाल रंगाचे कपडे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना 20 मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. हा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल. आता तिहार जेल मधून त्यांचे मृतदेह बाहेर येतील. आरोपीना फासावर लटकावण्याची सर्व तयारी झाली आहे. बुधवारी जल्लाद पवन ने चारही डमी आरोपींना एकत्र लटकावले. या प्रक्रिये दरम्यान या गोष्टीकडे लक्ष देण्यात आले की, कोणतीही चूक होणार नाही.

लाल पोशाखात निर्भयाचे गुन्हेगार

यावेळी, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की निर्भयाच्या गुन्हेगारांना लाल पोशाख घातला गेला आहे, हा प्रश्न उत्तराइतकाच मनोरंजक आहे. असे सांगितले जात आहे की, फाशीगृहाच्या चार वेगवेगळ्या सेलमध्ये बंदिस्त असलेले पवन गुप्ता, विनय गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय सिंग यांना लाल पोशाख घातले होते. तज्ञ म्हणतात की याचा अर्थ डेंजर झोन. म्हणजेच इतर कैदी या मार्गाने येऊ शकत नाहीत.

मुकेश सर्वात अस्वस्थ आहे

चारही दोषींपैकी मुकेश हा सर्वात अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे आणि हे चारही दोषी इतर दिवसांपेक्षा कमी खात आहेत. रात्री उशिरापर्यंत जागे रहात आहेत. चौघांनाही लाल रंगाचे शर्ट, लाल अंतर्वस्त्रे आणि लाल पँट घातली गेलेली आहे.. एवढेच नाही तर, त्यांच्या केससाठी वापरली जाणारी फाईलही लाल रंगाची आहे.

केवळ एक इशारा आणि फासावर लटकणार आरोपी

पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश सिंग आणि अक्षय सिंग यांना फाशीच्या दिवशी म्हणजेच 20 मार्च रोजी सेलमध्ये आंघोळ घातली जाईल, फाशी दिल्यानंतर थोड्या वेळासाठी तुरुंग क्रमांक 3 इतर कैद्यांसाठी उघडला जाईल. फाशीच्या दिवशी जेल अधिकारी, तुरूंग कर्मचारी, एसडीएम जेल क्रमांक ३ वर पोहोचतील आणि चौघांनाही एसडीएमच्या इशाराानंतर फाशी देण्यात येईल.