दत्तजयंतीनिमित्त ‘देवगड’ला भाविकांची गर्दी

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन –  मध्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती निमित्त भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली.

गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी वेदमंत्राच्या जयघोषात पहाटे साडेतीन वाजता भगवान श्री गुरू दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक घातला. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. सकाळी महाआरती बरोबरच क्षेत्र प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळाचे पथक प्रदक्षिणा मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

वाहतूक व्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय रोखण्यासाठी नेवासा पोलिसांचे पथक, होमगार्ड पथक, तसेच स्वयंसेवकांचे सेवाभावी पथक गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचेही पथक संस्थानच्या वतीने तैनात करण्यात आले आहे.