विकृतीचा कळस ! अल्पवयीन मुलासमोरच ‘तो’ ठेवायचा पत्नीशी शारीरीक संबंध

अमरावती : बेडरुममध्ये मुलासमान असलेल्या अल्पवयीन मुलाला गुपचुप उभे करुन त्यांच्यासमोर पत्नीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पत्नीने आपल्या ३५ वर्षाच्या पतीविरोधात खोलापूरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीच्या या विकृतीमुळे पोलिसांनाही धक्का बसला. त्यांनी पतीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा त्यांच्या शेजारी राहतो. त्याच्या आईवडिलांचा मृत्यु झाल्याने अनेक वर्षांपासून पती व तिच्या पत्नी या मुलाचे संगोपन करतात. या दाम्पत्याला तीन अपत्ये आहेत. तरीही या महिलेलाही त्या मुलाचा लळा लागला आहे.

पती रात्रीच्या वेळी या अल्पवयीन मुलाला झोपेतून उठवून घरी आणत असे आणि त्यांच्या बेडरुममध्ये गुपचुप उभे करुन त्यांच्या शारीरिक संबंध पाहण्यास सांगत असे. सुरुवातीला त्याला हा काय प्रकार आहे, याची काहीच कल्पना येत नव्हती.

एके दिवशी या महिलेला हा मुलगा घरात असल्याचे लक्षात आले आणि त्याने हा सर्व प्रकार पाहिल्याचे लक्षात आल्यावर ती हादरुन गेली. तिने पतीला जाब विचारल्यावर त्याने आपली विकृती कथन केली.

आपले खासगी जीवन मुलासमान असलेल्या अल्पवयीनासमोर पतीच उघडे करीत असल्याचे लक्षात येताच या महिलेला प्रचंड धक्का बसला. तिने थेट पोलिसांकडे धाव घेत पतीविरुद्ध तक्रार दिली आहे.