जोशी दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर मुलगा श्रेयसचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेली दोन दिवस ‘सीपीआर’च्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ मुलाने शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. श्रेयस विनोद जोशी (वय १८, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुण्यातील दाम्पत्य व्यावसायिक विनोद रमाकांत जोशी (५९), त्यांची पत्नी मीना जोशी (५५) मुलगा श्रेयस यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील एका हॉटेलमध्ये विष प्राशन केल्याचे शुक्रवारी रात्री उघडकीस आले होते. त्यामध्ये विनोद आणि मीना जोशी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर श्रेयस जोशी या अठरा वर्षाचा मुलगा बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. श्रेयसचा श्वास सुरू असल्याने त्याला ‘सीपीआर’मध्ये दाखल केले होते. गेले दोन दिवस येथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांचे नातेवाईक दोन दिवस कोल्हापुरात थांबून होते.

दरम्यान, विनोद जोशी व मीना जोशी यांच्यावर नातेवाइकांनी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा श्रेयसची मृत्युशी सुरु असलेला लढा थांबला. त्यानंतर रविवारी श्रेयसवरही पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून नातेवाईक पुण्याला रवाना झाले.

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

You might also like