मॅट्रिमोनियल साइटद्वारे महिलेची ८० हजारांची फसवणूक

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाईन 

ऑनलाईन विवाह पद्धती सध्या चांगलीच जोर धरत आहे. ऑनलाईन विवाह जुळवणाऱ्या या संकेत स्थळांमुळे काही वेळा फसवणूक झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पिंपरी येथे घडली आहे.विवाह जुळवणाऱ्या एका संकेत स्थळावरून एका महिलेला जवळपास ८० हजारांचा गंडा घातला गेल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,विवाह जुळवणाऱ्या एका संकेत स्थळावरून ओळख झालेल्या एकाने महिलेस लग्नाचे आमिष दाखवत महिलेला जवळपास ८० हजारांचा गंडा घातला. रजेंद्र मेनॉर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत ३७ वर्षीय महिलेने चिंचवड ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने भारत मॅट्रिमोनी या संकेतस्थवर विवाहाकरिता नाव नोंदणी केली होती. तिथे तिची ओळख आरोपी मेनॉर याच्याशी झाली. सोशल मिडियाच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात आले. परदेशात डॉक्टर असल्याचे फिर्यादी महिलेला सांगत तिचा विश्वास संपादन केला. तसेच लवकरच भारतात येणार असून आपण प्रत्यक्ष भेटू आणि त्यानंतर लग्न करू असे तिला सांगितले.काही दिवसांनी भारतात आलो असल्याचे त्याने तिला फोनवरून सांगितले. विमानतळावर उतरलो असून कस्टमचा माल सोडवण्यासाठी भारतीय चलन तातडीने आवश्यक आहे. असे सांगितले. तसेच बँक खात्यात रक्कम भरण्यास सांगितली. दोनदा तिने त्याच्या खात्यावर एकूण ७९ हजार ८०० रुपये इतकी रक्कम भरली. नंतर मात्र त्याचा फोन बंद झाला. तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आले.