Corornavirus : इथं ‘कोरोना’वरची पहिली लस आरोग्य मंत्र्यांनीच घेतली, लोक म्हणाले…

अबू धाबी : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विरुद्धची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. कोरोना विरुद्धच्या लसींच्या चाचण्या सुरु आहेत. संयुक्त अरब अमीरातचे (UAE) आरोग्य मंत्री अब्दुल रहमान बिन मोहम्मद अल ओवैस यांनी कोरोनावरची देशात तयार होत असलेली पहिली लस स्वत:वरच पहिल्यांदा घेतली. यूएईमध्ये सध्या या लशीच्या चाचण्या सुरु आहेत.

लोकांमधील भीती जावी, कोरोना योद्ध्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी औवैसी यांनी ही लस टोचून घेतल्याचे म्हटले जात आहे. तर त्यांच्या या कृतीचं लोकांनीही कौतुक केलं असून तुम्हाला मानलं पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्थानिक वृत्तपत्राने त्याबाबतचे वृत्त दिले आहे. क्लिनिकल ट्रायलचे सकारात्मक परिणाम आले असून ही लस पूर्ण सुरक्षित असल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान, जगातल्या श्रीमंत देशांनी आधीच 51 टक्के कोरोना लशीचं बुकिंग केलं असल्याचा खुलासा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या देशात जगाच्या लोकसंख्येच्या केवळ 13 टक्के लोक राहतात. तर बाकी 2.6 अब्ज लशीचे डोज भारत, बांग्लादेश आणी चीनसारख्या देशांनी बुक केलं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की पुढील महिन्यात अमेरिका कोरोना लशीचं रोल आऊट करणं सुरु करेल.

ट्रम्प यांच्या प्रशसानातील एका प्रमुख आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, 2021 च्या मध्यापर्यंत कोरोनाची लस येऊ शकते. ब्रिटनमधील ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टनुसार, काही श्रीमंत देशांनी कोरोना व्हायरसची संभावित लशीचा खुराक आधीपासूनच बुक करुन ठेवला हे. आता जगभरात एकूण संसर्गाची संख्या 3 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तर बरे होणाऱ्यांची संख्या 2 कोटी 17 लाखांहून अधिक आहे. कोरोनामुळे 9 लाख 44 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.