प्रदूषणामुळे देशाला 2 लाख 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान, 16 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2019 मध्ये आयसीएमआरने प्रदूषणाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभ्यासानुसार, गेल्या वर्षी भारतात प्रदूषणामुळे 16 लाखाहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. एवढेच नव्हे तर प्रदूषणामुळे भारताला 2 लाख 60 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भारताच्या जीडीपीच्या 1.4 टक्के इतके आहे. अनेक मुलांच्या अकाली मृत्यूमुळे भारताला 2,880 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रदूषणामुळे दिल्लीला सर्वाधिक आर्थिक नुकसान

राजधानीबद्दल बोलायचे झाले तर प्रदूषणामुळे दिल्लीला सर्वात जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. देशातील 18 टक्के मृत्यू प्रदूषणामुळे होतो. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये प्रदूषणाचा सर्वात वाईट आर्थिक परिणाम झाला आहे. आकडेवारीनुसार दर तासाला 282 आणि दररोज 4 हजार 383 लोक प्रदूषणामुळे आपला जीव गमावत आहेत. आयसीएमआरच्या अभ्यासानुसार 29 वर्षांत घरातील वायू प्रदूषण 64% कमी झाले तर मैदानी वायू प्रदूषणात 115% वाढ झाली.

5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या स्वप्नाला धक्का

द लेन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, बहुतेक मृत्यू पार्टीकुलर मॅटर PM 2.5 म्हणजेच हवायुक्त धूळ माइट्स आणि घरातील प्रदूषणामुळे होतात. या अभ्यासानुसार, प्रदूषणामुळे 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारतााच्या स्वप्नाला धक्का बसू शकतो.

भारतातील प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम दिल्लीत तर कमी केरळमध्ये झाला. दिल्ली, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेश याा 4 रााज्यांत जास्तीत जास्त प्रदूषणाचा परिणाम दिसून आला आहे. 56 टक्के लोक अजूनही चुलीवर स्वयंपाक करतात ज्यामुळे प्रदूषण होते. मात्र, गेल्या 29 वर्षांत त्यात लक्षणीय घट झाली आहे.

एकूण मृत्यूंपैकी –

– PM 2.5 मुळे -9 लाख 80 हजार मृत्यू झाले आहेत.

– घरगुती प्रदूषणामुळे -6 लाख 10 हजार मृत्यू

– ओझोन प्रदूषणामुळे 1 लाख 70 हजार लोकांचा मृत्यू.

गेल्या 29 वर्षांत काय बदलले

भारतात एकूण मृत्यूंपैकी 18 टक्के मृत्यू प्रदूषणामुळे झाले आहेत, त्यापैकी 10 टक्के हे PM 2.5 मुळे, 6.5 टक्के घरगुती प्रदूषण आणि ओझोन प्रदूषणामुळे जवळपास दीड टक्के मृत्यूमुळे झाले आहेत. मागील वर्षी प्रदूषणामुळे 40 टक्के लोकांना फुफ्फुसांच्या आजाराने ग्रासले आहे, तर 60 टक्के लोकांना हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघाताने ग्रासले आहे. त्यात मागील 29 वर्षात घरातील प्रदूषणामध्ये -64 टक्के घट, वायू प्रदूषण -115 टक्के वाढ, तर ओझोन प्रदूषण -135 टक्के वाढले आहे.