पुण्यातील विसर्जन मिरवणूक 24 तासात संपली, नवा विक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी २६ तास, २८ तास, ३० तास पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लागत असत. गेल्या वर्षी दुपारी १ वाजता विसर्जन मिरवणुक संपली. यंदाची मिरवणुक गेल्या काही वर्षातील सर्वात कमी वेळेत संपल्याचा विक्रम ठरणार आहे. विसर्जन मिरवणुक २४ तासात संपली आहे.

लक्ष्मी रोडवरील मुख्य मिरवणुकीत यंदा सहभागी होण्यासाठी २९० मंडळांनी पास घेतले होते. यंदा केवळ १५५ मंडळे लक्ष्मी रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाली होती. टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीत १२८ मंडळे सहभागी झाली. टिळक रोडवरील शेवटचा गणपती अमरज्योत मित्र मंडळाचा रथ टिळक चौकात सकाळी पावणे दहा वाजता आला.

यंदा लक्ष्मी रोडवरील मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या कमी झाली होती. विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून अनेकांनी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत केली. सकाळी पावणे दहा वाजता अलका टॉकीज चौकातून शेवटचा जनविकास मंडळाचा रथ विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या बंदोबस्ताची सांगता करण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –