TKSS : ‘चंदू’सोबत अर्चना पूरण सिंहची पडद्यामागे ‘गपशप’, व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – द कपिल शर्मा शो ची जज अर्चना पूरण सिंह हिनं गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागची मस्ती दाखवण्यास सुरुवात केली आहे. पुन्हा अर्चनाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे जो झपाट्यानं व्हायरल होत आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, अर्चना पूरण सिंह ड्रेसिंग रूम मध्ये तयार होत असलेल्या चंदन प्रभाकर सोबत बातचित करत आहे. चंदन आरशात आपले ओठ पाहून प्रॅक्टीस करत आहे एवढ्यात अर्चना तिथे येते आणि म्हणते, ओठांवर काय तू लिपस्टिक पहात होतास का. सुमोनाचे ओठ नाहीयेत तुझे. यावर चंदन म्हणतो, मर्जी करेल तसं बनव. यावर अर्चना त्याला म्हणते, तुझी मर्जी असेल ते तू बनो, कपिल तुला भिकारी बनवो.

यावर चंदन म्हणतो, नेहमीच त्याला माझ्यात भिकारी का दिसत असतो माहिती नाही. मी चांगले कपडे घातले तरीही तो म्हणतो कोणाचे कपडे घातले आहेत. मी सांगतो की, अरे हे माझेच आहेत. यानंतर चंदू अर्चानाची स्तुती करत म्हणतो की, मी इंस्टावर तुझे सारे फोटो पाठवले. तू खूप छान दिसत आहे.”

द कपिल शर्मा शो मध्ये अर्चना पूरण सिंह आणि कपिल शर्मा यांच्याव्यतिरीक्त कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, भारती सिंह, चंदन प्रभाकर आणि सुमोना चक्रबर्ती हे कलाकार काम करतात. वर्ल्ड फेमस असणारा हा शो शनिवारी आणि रविवारी टीव्हीवर सुरू असतो.