चीनमधून अधिकारी परतला कोरियामध्ये, राजानं चक्क गोळ्याच घातल्या

दक्षिण कोरिया : वृत्तसंस्था – सध्या जगभरात करोना व्हायरसचा कहर वाढला आहे. करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना प्रत्येक देशाने स्वतंत्र कक्ष तयार करून त्या ठिकाणी ठेवले जात आहे. उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन याच्या हुकूमशाही पद्धतीची सर्वांनाच माहिती आहे. एका छोट्या क्षुल्लक कारणासाठी किंवा चूकीसाठी तिथे मृत्यूदंड दिला जातो.

जगभरात करोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न शोधले जात आहेत. असे असताना उत्तर कोरियामध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. एका अहवालानुसार करोना व्हायरसचा संसर्गाच्या संशावरून उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याला स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, या अधिकाऱ्याने चुकून सार्वजनिक शौचालयाचा वापर केला, त्यामुळे त्याला जीव गमवावा लागला.

दक्षिण कोरियाच्या एका वृत्तपत्रानुसार, हा अधिकारी चीनमधून आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र, त्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यामुळे करोना व्हायरसचा संसर्ग पसरवण्यास आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर त्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्यात आले. एका वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याला चीन भेटीची माहिती लपवल्याच्या कारणामुळे देशातून हद्दपार केले आहे.

भारताने करोनाचा लढा जिंकला
संपूर्ण जग करोना व्हायरसशी लढा देत असताना भारताने हा लढा जिंकला आहे. केरळमधील दुसऱ्या रुग्णाला गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. अलाप्पुझ मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. चीनच्या वुहान येथून हा विद्यार्थी केरळमध्ये आला होता.