स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्याला जनता ठोकून काढते – नितीन गडकरी

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्वप्न दाखवणारे नेते लोकांच्या पसंतीला उतरतात मात्र स्वप्न पूर्ण नकरणाऱ्या नेत्याला जनता ठोकून काढते असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. स्वप्ने बघणे लोकांना आवडते आणि स्वप्ने दाखवणे हि लोकांना आवडते मात्र स्वप्ने दाखवणाऱ्याने स्वप्ने पूर्ण केली नाहीत तर मात्र लोक त्या व्यक्तीला ठोकून काढतात असे नितीन गडकरी म्हणले आहेत. ते आज मुंबईमध्ये भाजपच्या कार्यक्रमात बोलत होते.

अभिनेत्री ईशा कोप्पीक यांच्या प्रवेशासाठी भाजपने मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्या प्रसंगी बोलतांना नितीन गडकरी यांनी हे सूचक विधान केले आहे.

ADV

कोणते हि स्वप्न हृदयात वास करत असते. कोणतीही सत्ता डोळे वटारून बघू शकते. मात्र कोणत्या हि व्यक्तीच्या स्वप्नाला कोणी संपवू शकत नाही. स्वप्नांचं आणखी एक विशिष्ट असतं, जी लोक स्वप्न दाखवत असता, पण ती पूर्ण करत नाहीत. अशा नेत्यांना जनता ठोकून काढते. त्यामुळे स्वप्ने अशी दाखवा जी पूर्ण करता येऊ शकतात असे गडकरी म्हणाले आहेत. मी स्वप्ने दाखवणारा मंत्री नाही मी काम करून दाखवणारा मंत्री आहे असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

या आधीही नितीन गडकरी यांनी अशीच वादग्रत वक्तव्य केली आहेत. ज्यातूनभाजपच्या भूमिके पेक्षा वेगळी भूमिका त्यांनी घेतली आहे. इंदिरा गांधीची स्तुती करून त्यांना त्यांच्या काळातील सर्वात प्रभावशाली नेत्या म्हणून त्यांनी संबोधले होते. त्यांच प्रमाणे हिजड्यांना मुले होतील मात्र महाराष्ट्रातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाहीत असे हि वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. तसेच शेतकऱ्यांनी आता उसाचे उत्पादन थांबवले पाहिजे अन्यथा तयार साखर समुद्रात टाकून देण्याची वेळ येईल असे हि विधान नितीन गडकरी यांनी सांगलीच्या शेतकरी मेळाव्यात केले होते. वादग्रत विधानातून गडकरी नेमके काय साध्य करू पाहत आहेत या संदर्भात राजकीय क्षेत्रात तर्कवितर्कांना अलीकडच्या काळात उधाण आले आहे. त्यात गडकरी यांचे आजचे वक्तव्य भर घालणारेच होते.