येरवड्यात घरीच साकारला स्त्री भ्रूण हत्या विषयी जिवंत देखावा

मीना मुंडे

गणेशोत्सव काळात येरवडा येथील गवळी वाडा मध्ये मीना मुंडे यांनी आपल्या राहत्या घरी स्त्री भ्रूण हत्या बाबत जनजागृती करणारा जिवंत देखावा सादर केला आहे. हा देखावा पहाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरीक मुंडे यांची घरी गर्दी करत आहेत.

मीना मुंडे या गणेशोत्सव काळात दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपल्या घरी राबवत असतात. गेल्या वर्षी त्यांनी जय मल्हार चा जिवंत देखावा सादर केला होता. आता यावेळी त्यांनी बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी स्त्री भ्रूण हत्या कशाप्रकारे होतात व त्या कशा थांबवू शकतात याबाबत 12 वर्षा खालील मुलांना घेऊन जिवंत देखावा सादर केला आहे. पात्र करण्यासाठी मीना मुंडे यांनी आपली मुलगी, मुलगा व शेजारच्या दोन मुलांना सहभागी करून घेतले आहे. ही छोटी मुले आपापल्या पत्रातून बेटी बचाओ चा संदेश देत आहेत. हा जिवंत देखावा पाहण्यासाठी मुंडे यांच्या घरी रात्रभर नागरिक रांगा लावून पहात आहेत.

याविषयी माहिती देताना मीना मुंडे म्हणाल्या, मला हा जिवंत देखावा करण्यासाठी चार दिवस लागले. टेरेसवर झोपडी वजा घर तयार केले आहे. पात्र करण्यासाठी माझ्या दोन्ही मुलांसह शेजरची दोन मुले घेतली आहेत. मुलगी होऊन द्यायची नाही अन् झाली तर तिला मारून टाकायचे हा संपूर्ण प्रकार आपण जिवंत पात्रातुन मांडला आहे. या जिवंत देखावातून बेटी बचाओ चा संदेश देण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B07DY35DX3,B01FAFHZES’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6b86b412-ba75-11e8-8b7e-2faa4e27818f’]